Realme India ने आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Realme Narzo 50i प्राइम भारतात लाँच केला आहे. हा फोन Octacore Unisoc प्रोसेसर आणि 5,000mah बॅटरी सह सादर करण्यात आला आहे. Realme ने हा फोन भारतीय बाजारपेठेपूर्वी मलेशियामध्ये लाँच केला होता. Realme Narzo 50i Prime मध्ये 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले आणि Android 11 साठी सपोर्ट आहे. फोन 4 GB पर्यंत रॅम आणि 64 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
हे सुद्धा वाचा : Movie Release This Week : या आठवड्यात धमाका करायला येतायेत 'हे' हिंदी आणि मराठी चित्रपट
Realme Narzo 50i Prime मध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 720×1,600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 88.7 टक्के आहे. फोनमध्ये Android 11 आधारित Realme UI Go Edition देण्यात आले आहे. Realme Narzo 50i प्राइम ऑक्टा-कोर Unisoc T612 प्रोसेसरसह 64 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आणि 4 GB पर्यंत RAM चे समर्थन करतो. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येते.
त्याबरोबरच, 5000mAh बॅटरी आहे. बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, ती 4 दिवस चालु शकते. मात्र, कंपनीने चार्जिंग पोर्टबाबत माहिती दिलेली नाही. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ आणि Wi-Fi सपोर्ट करण्यात आला आहे. फोनचे वजन 182 ग्रॅम आहे.
या व्यतिरिक्त, फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा AI सिंगल रियर कॅमेरा मिळतो, जो LED फ्लॅश लाईट सपोर्टसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. मागील कॅमेरासोबत HDR सपोर्ट देण्यात आला आहे.
हा फोन डार्क ब्लू आणि मिंट ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 3 GB रॅमसह 32 GB स्टोरेजची किंमत सुमारे 7,999 रुपये आहे. तर, 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेजची किंमत सुमारे 8,999 रुपये आहे. Realme Narzo 50i प्राइम 23 सप्टेंबरपासून दुपारी 12 वाजता Amazon ग्रेट इंडियन सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, प्राइम सदस्य एक दिवस आधी म्हणजेच 22 सप्टेंबरपासून फोन खरेदी करू शकतात.