6000mAh बॅटरी असलेला Realme फोन 9 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे, बघा डील

6000mAh बॅटरी असलेला Realme फोन 9 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे, बघा डील
HIGHLIGHTS

Realme Narzo 50A फोन फक्त 9 हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी

Amazon वर सुमारे 23 टक्के डिस्काउंटसह फोन उपलब्ध

स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

Great Indian Festival Sale काही दिवसांत म्हणजे 23 सप्टेंबर रोजी Amazon India वर सुरू होणार आहे. मात्र, याआधी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किकस्टार्टर सेल सुरू आहे. या सेलमध्ये Realme Narzo 50A स्मार्टफोनवर बेस्ट डिस्काउंट मिळत आहे. आता जर तुम्ही स्वस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या सेल दरम्यान तुम्ही Realme चा हा फोन फक्त 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात फोनवरील डील्स… 

हे सुद्धा वाचा : 12GB रॅम असलेल्या Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनवर 20,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर

 या सेल दरम्यान, तुम्हाला Amazon India वर Realme Narzo 50A स्मार्टफोन सुमारे 23 टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. Amazon India वरील या ऑफरनंतर तुम्ही हा फोन फक्त 8,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता.

REALME NARZO 50A चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 50A हा अतिशय उत्तम फीचर्ससह स्वस्त फोन आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसरसह 4GB RAM सह समर्थित आहे. जर तुम्ही स्टोरेज बघितले, तर तुम्हाला फोनमध्ये दोन व्हेरिएंट  मिळत आहेत. फोन 64GB आणि 128GB स्टोरेज सह खरेदी करता येईल. तसेच, तुम्ही मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज वाढवू शकता. 

फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा HD + वॉटरड्रॉप- स्टाईलचा नॉच डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 88.7 टक्के आहे. कॅमेरा मॉड्यूलसह ​​मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो.

Realme Narzo 50A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सेल आहे. दुसरा 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि तिसरा 2-मेगापिक्सलचा ब्लॅक आणि व्हाईट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये AI आधारित फीचर्स देखील आहेत. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 6000mAh आहे. फोन Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, 4G VoLTE आणि USB-C पोर्टला सपोर्ट करतो.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo