Realme Narzo 50 Pro 5G ची पहिली विक्री आज 10 जून रोजी होणार आहे. कंपनीच्या मते, Realme Narzo 50 Pro 5G ची पहिली विक्री realme.com आणि Amazon वर दुपारी 12:00 वाजता सुरू होईल. हा फोन बॉक्सी डिझाइन, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि सेल्फी शूटरसह येतो. तसेच, ग्राहकांना HDFC डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर फ्लॅट 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या फोनवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्स आणि सवलतींबद्दल…
हे सुद्धा वाचा : दमदार बॅटरीसह LENOVO TAB P12 PRO भारतात लाँच, AMOLED डिस्प्लेसह मिळतील अनेक फीचर्स
फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 920 5G चिपसेटसह येतो. हा डिवाइस Android 12-आधारित Realme UI 3.0 वर चालतो. Narzo 50 Pro 5G मध्ये मागील बाजूस 48MP प्रायमरी सेन्सर, 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MPचा तिसरा कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. व्हिडीओ कॉल्स आणि आकर्षक सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये फ्रंटला 16MP कॅमेरा आहे. Realme Narzo 50 Pro 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme चा हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. स्मार्टफोनची विक्री आज 10 जूनपासून सुरू होत आहे. सेलमध्ये, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला EMI वर फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 1,036 रुपयांमध्ये हा फोन स्वतःचा बनवू शकता.