APPLE च्या नवीन iPhone सिरीज मध्ये म्हणजेच iPhone 14 सिरीजमध्ये नवीन dynamic island नावाचे फीचर्स बघायला मिळाले. असे आकर्षक फिचर सर्वप्रथम iPhone मध्ये बघायला मिळाले. परंतु, लवकरच तुम्हाला Realme च्या फोनसह dynamic island पाहायला मिळेल. Realme ने या फीचरला Realme Mini Capsule असे नाव दिले आहे.
रियलमी इंडियाचे CEO माधव सेठ यांनीही Realme Mini Capsule ची पोस्ट शेअर केली. मात्र, त्यांनी नंतर पोस्ट डिलीट केली.
हे सुद्धा वाचा : तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करा iPhone 14 Plus, Jio ची जबरदस्त ऑफर
याशिवाय, टिपस्टर स्टीव्ह एच. मॅकफ्लाय (@onleaks) ने देखील Realme Mini Capsule बद्दल ट्विट केले आहे, ज्यामध्ये फोनचे डिझाइन पाहिले जाऊ शकते. Realme Mini Capsule देखील आयफोनच्या डायनॅमिक आयलँडसारखे आहे. चार्जिंग आणि म्युझिक प्लेबॅकची माहिती Realme Mini Capsule मध्ये मिळेल.
https://twitter.com/OnLeaks/status/1628390940070092801?ref_src=twsrc%5Etfw
गेल्या वर्षी, realme ने 'realme Island – Creators Challenge' लाँच केले ज्यामध्ये लोकांना Apple च्या डायनॅमिक आयलँडबद्दल सूचना विचारण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली होती. Realme ने अद्याप Realme Mini Capsule बद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
काल, रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी फीचरचा एक फोटो ट्विट केला आणि त्याला रियलमी मिनी कॅप्सूल म्हटले. त्यांनी असेही सांगितले की, हे फिचर लवकरच C सीरीज डिव्हाइसेसवर उपलब्ध होईल, परंतु त्यांनी नंतर ट्विट हटवले. अफवांवर आधारित, हे आगामी realme C55 स्मार्टफोनसह सादर केले जाईल, जे 33W जलद चार्जिंगला समर्थन देईल. Realme ने अधिकृतपणे घोषणा केल्यानंतर याबाबत अधिक तपशील समोर येईल.