भारीच की ! Realme च्या सर्वात स्वस्त 80W चार्जिंग फोनवर 7000 ची सूट, जाणून घ्या ऑफर

Updated on 15-Sep-2022
HIGHLIGHTS

Realme GT Neo 3T भारतात लाँच होणार

कंपनीने लाँचपूर्वीच फोनवरील ऑफर्स जाहीर केले आहेत

या फोनवर तुम्हाला तब्बल 7,000 रुपयांची सूट मिळेल

Realme चा सर्वात स्वस्त 80W फास्ट चार्जिंग स्मार्टफोन Realme GT Neo 3T उद्या 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता भारतात लाँच होणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वीच ब्रँडने लॉन्च ऑफरची घोषणा केली आहे. नवीन Realme GT Neo 3T वर 7,000 सूट उपलब्ध असणार आहे. जाणून घेऊयात खास ऑफरबद्दल सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : Jio च्या 'या' प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता आणि अमर्यादित कॉलसह 740GB डेटा मिळतो, पहा पूर्ण प्लॅन

Realme GT Neo 3T चे स्पेसिफिकेशन्स

GT Neo 3T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.62-इंच लांबीचा E4 AMOLED डिस्प्ले आहे. फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह समर्थित आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो स्नॅपर आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जरसह डिव्हाइस केवळ 12 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होईल.

Realme GT Neo 3T वर डिस्काउंट ऑफर

Realme GT Neo 3T बद्दल ब्रँडने घोषणा केली आहे की, कंपनी या फोनवर 7,000 रुपयांची सूट देईल. मात्र, या सवलतीचा तपशील अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे. Realme फेस्टिव्ह डेजचा भाग म्हणून हा स्मार्टफोन लाँच  होत आहे, ज्यामध्ये अनेक Realme प्रोडक्ट्सवर प्रचंड सूट दिली जाईल.

Realme GT Neo 3T वर उपलब्ध असलेली ही सूट बँक ऑफरचा भाग असू शकते. लाँचदरम्यान, ऑफरबद्दल अधिक तपशील जाहीर होण्याची अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme GT Neo 3T आधीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाला आहे आणि उद्या फोन भारतात दाखल होणार आहे.

आत्तापर्यंत, स्नॅपड्रॅगन 870 आणि 80W चार्जिंगसह iQOO Neo 6 स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. असे दिसते की, Realme GT Neo 3T फोन iQOO फोनला मागे टाकेल. GT Neo 3T फोनचा बेस व्हेरिएंट 29,999 रुपयांना लाँच झाला असला तरी ऑफर्सनंतर तो 22,999 रुपयांना उपलब्ध होईल, अशी माहिती मिळाली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :