Realme GT Neo 3T स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार, बघा आकर्षक डिझाईन आणि फीचर्स
Realme GT Neo 3T स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.
हा स्मार्टफोन Realme Q5 Proचे रीर्ब्रँडेड वर्जन असेल.
हा स्मार्टफोन भारतात 150W फास्ट चार्जसह सादर करण्यात आला आहे.
Realme GT Neo 3T स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार आहे. रिअलमीचा हा स्मार्टफोन 7 जून रोजी Realme GT Neo 3 सोबत सादर केला जाईल, असे म्हटले जात आहे. त्याबरोबरच, Realme GT Neo 3 हा स्मार्टफोन भारतात 150W फास्ट चार्जसह सादर करण्यात आला आहे. असा अंदाज आहे की, Realme GT Neo 3T स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या पूर्वीच्या Realme Q5 Pro स्मार्टफोनचे रीब्रँडेड वर्जन आहे. Realme GT Neo 3T लॉन्च होण्यापूर्वी, त्याच्या रियर पॅनेलची डिझाईन समोर आली आहे. या डिझाइनकडे पाहता, असे समजते की हा स्मार्टफोन अगदी Realme Q5 Pro सारखा आहे.
Realme ने अहमदाबादमध्ये पहिले जागतिक फ्लॅगशिप स्टोअर उघडले आहे. Realme ने पहिल्यांदाच Realme GT Neo 3T स्मार्टफोन त्याच्या स्टोअर ओपनिंगमध्ये प्रदर्शित केला आहे.
हे सुद्धा वाचा : आधार फ्रॉड टाळण्यासाठी आलं Masked Aadhaar! फक्त दोन मिनिटांत करा डाउनलोड
Realme GT Neo 3T
Realme ने आपल्या फ्लॅगशिप स्टोअरच्या उद्घाटनावेळी Realme GT Neo 3T स्मार्टफोनची एक झलक दाखवली आहे. त्याच्या डिझाईनवरून कळते की, हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Realme Q5 Pro ची रीर्ब्रँडेड आवृत्ती असेल. Realme GT Neo 3T स्मार्टफोन येलो आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. यासोबत या फोनचा रियर पॅनल हनीकॉम्ब डिझाइनचा आहे. जो या फोनला इतर फोनपेक्षा हटके बनवतो.
Realme चे CEO माधव सेठ यांनी पुष्टी केली आहे की या Realme स्मार्टफोनची एक विशेष Naruto आवृत्ती देखील सादर केली जाईल. मात्र, ही आवृत्ती भारतात लाँच केली जाईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
हे सुद्धा वाचा : WhatsAppवर येणार नवीन फिचर, आता सर्व अनरिड चॅट्स एकाच वेळी बघता येतील
Realme GT Neo 3Tचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हा फोन रिअलमी Q5 प्रो ची रिब्रँडेड आवृत्ती असू शकतो. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.62-इंच लांबीचा फुल HD + E4 AMOLED डिस्प्ले असले, हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वेरिएंटमध्ये येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून, यात Snapdragon 870 चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जाणार आहेत.
कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असेल. रिअलमीचा हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. या फोनचा 150W चार्ज व्हेरिएंट देखील लाँच केला जाईल. Realme GT Neo 3T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile