प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या नव्या Realme GT 7 Pro चे प्री-बुकिंग भारतात सुरू झाले आहे. हा फ्लॅगशिप फोन आजपासून म्हणजेच 18 नोव्हेंबरपासून भारतीय बाजरात बुक केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर अनेक आकर्षक प्री-बुकिंग ऑफर्स मिळत आहेत. लक्षात घ्या की, Realme GT 7 Pro 26 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme च्या आगामी स्मार्टफोनचे प्री-बुकिंग ऑफर्स-
Also Read: Upcoming MI Smartphones: प्रसिद्ध कंपनी लवकरच भारतात लाँच करणार जबरदस्त फोन्स, पहा यादी
Realme GT 7 Pro प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर प्री-बुक केले जाऊ शकते. आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. प्री-बुक करण्यासाठी ग्राहकांना Amazon वर 1,000 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून हा फोन प्री-बुक करण्यासाठी तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील.
प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 1 वर्षाचा स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स मिळेल. त्याबरोबरच, ग्राहकांना 1 वर्षाची विस्तारित वॉरंटीही देखील मिळेल. Realme GT 7 Pro बुक करणारे वापरकर्ते 12 महिने विनाशुल्क EMI घेऊ शकतील. एवढेच नाही तर, ऑफलाइन स्टोअरवर 24 महिन्यांच्या हप्त्याची सुविधा देखील उपलब्ध असेल.
Realme GT 7 Pro आधीच चिनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Realme GT 7 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा 8T LTPO Samsung Eco2 1.5K OLED पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर लाँच केला गेला आहे. Realme GT 7 Pro हा IP69+IP68 प्रमाणित स्मार्टफोन आहे.
फोटोग्राफीसाठी, Realme GT 7 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP IMX906 OIS मुख्य सेन्सर, 50MP IMX882 पेरिस्कोप लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, 6,500 बॅटरीला सपोर्ट करते, जी 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. लक्षात घ्या की, ही एक सिलिकॉन-कार्बन निगेटिव्ह इलेक्ट्रोड बॅटरी आहे, जी फोनला बराच वेळ जागृत ठेवण्याची क्षमता ठेवते.