Realme GT 7 Pro ची भारतीय लाँच डेट जारी! Powerful फीचर्ससह ‘या’ दिवशी होणार दाखल

Updated on 04-Nov-2024
HIGHLIGHTS

Realme GT 7 Pro स्मार्टफोनची भारतीय लाँच तारीख अखेर जाहीर

Realme GT 7 Pro फोन नोव्हेंबरच्या शेवटी भारतात दाखल होईल.

अखंड कार्यासाठी हँडसेटमध्ये Snapdragon 8 Elite चिप उपलब्ध असेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या Realme GT 7 Pro च्या लाँचची चर्चा टेक विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता अखेर या स्मार्टफोनची भारतीय लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः या स्मार्टफोनमध्ये सुरळीत कामकाजासाठी क्वालकॉमचा नवीनतम आणि पॉवरफुल Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 24GB रॅम सारखे फीचर्स देण्यात मिळतील. नुकतेच हा फोन कंपनीने जागतिक बाजारात लाँच केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात या फोनचे लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: Smartphones Launch in November 2024: जबरदस्त स्मार्टफोन्स बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, पहा यादी

Realme GT 7 Pro चे भारतीय लॉंचिंग

स्मार्टफोन ब्रँड Realme च्या मते, Realme GT 7 Pro 26 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच होईल. कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलद्वारे या फोनच्या लाँचबद्दल माहिती दिली आहे. Realme GT 7 Pro ची बाजारात Samsung, Xiaomi आणि Vivo सारख्या कंपन्यांच्या फोनशी स्पर्धा होईल.

Realme ने GT7 Pro च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीकनुसार, या फोनची किंमत 45 ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते. हा फोन अनेक आकर्षक कलर ऑप्शन्ससह सादर केला जाईल.

Realme GT 7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंतच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, अखंड कार्यासाठी हँडसेटमध्ये Snapdragon 8 Elite चिप उपलब्ध असेल. Realme GT 7 Pro फोन विशेष OLED स्क्रीनसह सुसज्ज असेल. तसेच, यात डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट असेल. हा मोबाइल फोन नवीनतम Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. त्याबरोबरच, हा GT सिरीज स्मार्टफोन फास्ट चार्जिंगसह 6500mAh जंबो बॅटरीसह येईल. यात ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, NFC, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स असतील.

फोटोग्राफीसाठी, या आगामी स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी यात 32MP कॅमेरा असू शकतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तब्बल 24GB रॅमच्या पॉवरसह सादर करण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये AI टेलिफोटो अल्ट्रा क्लॅरिटी फीचर उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :