प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या Realme GT 6T ची लाँच तारीख अखेर निश्चित झाली आहे. या आगामी स्मार्टफोनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर अखेर या फोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. Realme चा आगामी Realme GT 6T स्मार्टफोन 22 मे रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँच डेटव्यतिरिक्त हा फोन Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हे सुद्धा वाचा: अखेर POCO F6 5G स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित, टीझरमध्ये बघा फोनची पहिली झलक। Tech News
ताज्या अहवालानुसार, Realme च्या आगामी स्मार्टफोन Realme GT 6T ची किंमत 31,999 रुपये असेल. मात्र, फोनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लीकनुसार, आगामी स्मार्टफोन सिंगल कलर ऑप्शन सिल्व्हरमध्ये येईल. फोन ड्युअल टेक्सचर डिझाइनमध्ये येईल. फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा लेन्स दिले जातील. तसेच, LED फ्लॅश लाईट सुद्धा यात देण्यात येणार आहे.
लीकनुसार, Realme GT 6T स्मार्टफोन 6.78 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्लेसह येईल, त्यासह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen3 चिपसेट सपोर्टसह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीसाठी, हा फोन ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS सह येतो. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध असेल. तर, आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन 100W सुपर डार्ट चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो. मात्र, फोनचे कन्फर्म डिटेल्स लाँच झाल्यावरच पुढे येतील.