Realme GT 6T ची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, मिळवा तब्बल 4000 रुपयांचा Discount। Tech News

Updated on 29-May-2024
HIGHLIGHTS

नवीनतम स्मार्टफोन Realme GT 6T ची पहिली सेल आज

Realme GT 6T फोनची ही सेल 1 जूनच्या मध्यरात्री 12 पर्यंतच चालेल.

Realme GT 6T वर बँक ऑफरसह मिळेल तब्बल 4000 रुपयांचा डिस्काउंट

Realme GT 6T: Realme ने अलीकडेच आपला नवीनतम स्मार्टफोन Realme GT 6T भारतीय बाजरात लाँच केला आहे. त्यांनतर, आज म्हणजेच 29 मे रोजी या स्मार्टफोनची खुली विक्री भारतात सुरु होणार आहे. कंपनीने हा गेमिंग फोन चार वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. Realme GT 6T च्या पहिल्या सेदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. Realme GT 6T ची किंमत आणि ऑफर्स बघा-

Realme GT 6T पहिली सेल

Realme GT 6T ची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तुम्ही कंपनीच्या भारतीय अधिकृत वेबसाइट realme.com वरून Realme GT 6T फोन खरेदी करू शकता. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फोनची ही विक्री 1 जूनच्या मध्यरात्री 12 पर्यंतच चालेल. त्याबरोबरच, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर देखील फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Realme GT 6T ची किंमत आणि ऑफर्स

Realme GT 6T स्मार्टफोन कंपनीने चार व्हेरिएंटमध्ये भारतात सादर केला आहे. 8GB + 128GB व्हेरिएंट 30,999 रुपये, 8GB+256GB व्हेरिएंट 32,999 रुपये, 12GB+256GB व्हेरिएंट 35,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिएंट 39,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी Realme GT 6T वर बँक ऑफरसह 4000 रुपयांचा डिस्काउंट देणार आहे. तसेच, तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये 2000 रुपयांचा ऑफ देखील मिळणार आहे. यासह हा फोन आज 26,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Realme GT 6T

Realme GT 6T चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6T फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर देखील मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये Sony 50MP मुख्य कॅमेरा, Sony IMX355 8MP अल्ट्रा वाइड-एंगल मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 5500mAh बॅटरी आणि 120W SUPERVOOC चार्जसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :