लेटेस्ट Realme GT 6 5G ची पहिली सेल भारतात आज होणार सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर 

लेटेस्ट Realme GT 6 5G ची पहिली सेल भारतात आज होणार सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर 
HIGHLIGHTS

Realme GT 6 5G गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच

Realme GT 6 5G स्मार्टफोन अनेक AI फीचर्सद्वारे सुसज्ज आहे.

पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला Realme GT 6 5G सह 4 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Realme GT 6 5G: नवीनतम Realme GT 6 5G गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला. दरम्यान, या स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 25 जून रोजी भारतात सुरु होणार आहे. Realme GT 6 ची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून लाईव्ह होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या कालावधीत फोन डिस्काउंट ऑफरसह खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन अनेक AI फीचर्सद्वारे सुसज्ज आहे. जाणून घ्या Realme GT 6 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: 50MP कॅमेरा आणि आकर्षक फीचर्ससह OnePlus Nord CE4 Lite 5G फोन भारतात लाँच, किंमतही कमी

Realme GT 6
Realme GT 6

Realme GT 6 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme GT 6 5G हँडसेट 8GB+256GB, 12GB+256GB आणि 16GB+512GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मध्ये सादर करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 40,999, 42,999 आणि 44,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. पहिल्या सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीसह या डिव्हाइसवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध असतील.

AI फीचर्ससह सुसज्ज

Realme GT6 5G स्मार्टफोन AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता फीचर्ससह सुसज्ज आहे. या मोबाईल फोनमध्ये AI इमेजिंग, AI Efficiency आणि AI Personalization सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या फीचर्सद्वारे यूजर्स अधिक चांगले फोटो काढू शकतात. एवढेच नाही तर, या हँडसेटमध्ये फोटो Edit करण्यासाठी AI टूल्सदेखील उपलब्ध आहेत.

Realme GT 6 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme चा नवीन स्मार्टफोन Realme GT 6 5G हँडसेटमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Realme-GT6-Top-5-features
Realme GT 6

फोटोग्राफीसाठी या Realme GT 6 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS ला सपोर्ट करणारा 50MP प्राथमिक लेन्स आहे. तर, दुसरा 50MP टेलिफोटो सेन्सर आहे आणि तिसरा 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 32MP कॅमेरा मिळणार आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 5500mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असेल. ही बॅटरी 26 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 1 दिवसापेक्षा जास्त काळ टिकण्याची क्षमता ठेवते, असा कंपनीचा दावा आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, NFC आणि USB टाइप-C पोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo