प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme GT 6 स्मार्टफोन चीन, भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केलेली नाही. लाँचपूर्वी स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. अलीकडेच हा स्मार्टफोन FCC डेटाबेसमध्ये दिसला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme च्या या आगामी स्मार्टफोनचे लॉन्चिंग तपशील-
हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! Vodafone Idea ने Airtel आणि Jio ला टाकले मागे, लाँच केला सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन। Tech News
Realme GT 6 स्मार्टफोन SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो. हा स्मार्टफोन ड्युअल सेल बॅटरीसह येईल. बॅटरी क्षमता 2,680mAh असेल आणि ठराविक मूल्य 2,750mAh असेल. म्हणजेच Realme च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, दुसऱ्या अहवालातून अशी माहिती मिळाली आहे की, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह येऊ शकतो. अहवालानुसार, फोन 16GB पर्यंत रॅम मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी हा फोन 50MP प्राथमिक कॅमेराने सुसज्ज असू शकतो.
अलीकडेच आलेल्या ताज्या अहवालानुसार, FCC डेटाबेसमध्ये हे समोर आले आहे की, हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड स्लॉट आणि 5G सपोर्टसह आणला जाईल. Realme GT 6 स्मार्टफोनमध्ये n5, n7, n38, n41 आणि n66 SA बँड असतील, अशी माहिती मिळाली आहे. त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, ग्लोनास, BDS, गॅलीलिओ, NFC सारखे ऑप्शन्स असतील.
याशिवाय आगामी फोनबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, कंपनी लवकरच स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि लॉन्चिंग डेट इत्यादींबाबत इतर माहिती देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी, हा फोन BIS सर्टिफिकेशनवर देखील स्पॉट झाला आहे. त्यामुळे लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतही दाखल होणार आहे.