Realme ने अलीकडेच भारतीय बाजारात Realme GT 6T स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानंतर, Realme GT 6 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. होय, आता कंपनी नवा Realme GT 6 फोन आणणार आहे. हा कंपनीचा AI फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये अनेक प्रगत AI फीचर्स दिले जातील. आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक लीक्स देखील पुढे आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता, या फोनशी संबंधित सर्व तपशील बघुयात.
Realme India ने Realme GT 6 स्मार्टफोनशी संबंधित तपशील त्यांच्या अधिकृत X (Twitter) अकाउंटद्वारे उघड केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा फोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे. हा कंपनीचा AI फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये अनेक ॲडव्हान्स एआय फीचर्स दिले जातील, अशी माहिती देखील या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
ताज्या लीकनुसार Realme GT 6 फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले असेल. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 6000nits असेल. याशिवाय, फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन दिले जाईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
याव्यतिरिक्त Eurofins सूचीनुसार, या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी असेल. या फोनमध्ये 120W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्याबरोबरच, इतर लीकनुसार हा फोन 50MP प्राथमिक कॅमेरासह दाखल होऊ शकतो. याआधी कंपनीने Realme GT 6T फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला होता.
Realme GT 6T फोन भारतात चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा व्हेरिएंटचा समावेश आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी आहे.