अनेक AI फीचर्सने सुसज्ज Realme GT 6 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
लेटेस्ट Realme GT 6 5G अखेर भारतीय बाजारात लाँच
26 मिनिटांच्या चार्जवर हा Realme GT 6 5G फोन 1.90 दिवसांसाठी वापरता येईल, कंपनीचा दावा
Realme GT 6 5G फोनमध्ये Next AI देण्यात आला आहे.
Realme GT 6 5G अखेर भारतीय बाजारात लाँच करण्यात आला झाला आहे. बऱ्याच काळापासून फोनच्या लाँचची चर्चा सुरु होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनच्या पहिल्या विक्रीमध्ये अनेक अप्रतिम ऑफर्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Realme GT 6 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: नवा Affordable स्मार्टफोन Vivo Y58 5G भारतात लाँच, मोठ्या बॅटरीसह मिळतील अप्रतिम फिचर्स। Tech News
Realme GT 6 5G ची किंमत
Realme ने Realme GT 6 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 38,999 रुपये आहे. त्याच्या तिसऱ्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा फोन फ्लुइड सिल्व्हर आणि रेझर ग्रीन कलर पर्यायांमध्ये येतो.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनच्या बेस व्हेरिएंटवर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट मिळेल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 25 जूनपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Next AI
Realme GT 6 5G फोनमध्ये Next AI देण्यात आला आहे. याद्वारे, Ai Imaging, Ai Efficiency आणि Ai Personalization फोनमध्ये उपलब्ध असतील. फोनमधील फोटोग्राफीचा अनुभव AI द्वारे सुधारण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये AI नाईट व्हिजन मोड उपलब्ध आहे, जो तुम्हाला रात्रीच्या अंधारात उत्तम दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ प्रदान करेल. त्याबरोबरच, Ai Smart Image Matting फिचर Google फोटोद्वारे फोटो स्टोरेज आणि एडिट सुविधा देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, गुगल फोटो वापरकर्त्यांना मॅजिक एडिटर, ब्लर, इरेजर सारखी टूल्स देतात.
Realme GT 6 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme GT 6 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W SuperVooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 26 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 1.90 दिवसांसाठी वापरता येईल, असा कंपनीने दावा केला आहे.
याव्यतिरिक्त, Realme च्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, 50MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये तिसरा 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile