Realme GT 5 Launch: 240W फास्ट चार्जिंगसह नवा फोन लाँच होण्यासाठी सज्ज, लाँच डेट कन्फर्म
Realme GT5 कंपनीचा नवा आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच होण्यासाठी सज्ज
हा Realme फोन 24GB RAM सह दाखल होईल.
या फोनचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुपरफास्ट चार्जिंग क्षमता आहे.
Realme GT5 कंपनीचा नवा आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित करण्यात आली आहे. लाँच होण्याआधीच फोनबद्दल बरीच चर्चा टेक विश्वात सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी गेल्या काही दिवसांपासून फोनच्या फीचर्सशी संबंधित माहिती टीज करत होती. त्यानंतर, आता अखेर या लॉन्चची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे कंपनी हा फोन आपल्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त लाँच करणार आहे. लाँच पूर्वी कंपनीने फोनचे पावरफुल फिचर्स टीज केले आहेत. हा Realme फोन 24GB RAM सह दाखल होईल. याशिवाय, या फोनचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुपरफास्ट चार्जिंग क्षमता आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता फोनचे लाँच डेट आणि तपशिलांबद्दल संपूर्ण माहिती बघुयात.
Realme GT 5 लाँच डेट
Realme कंपनीने आपल्या चीनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर नवीनतम टीझर पोस्टर शेअर केले आहे. या टीझर पोस्टरमध्ये माहिती देण्यात आली आहे की, Realme GT5 स्मार्टफोन 28 ऑगस्ट 2023 ला लाँच होईल. या दिवशी कंपनी आपले 5वा वर्धापन दिन साजरा करणार आहे आणि यासह Realme GT5 लाँच करेल.
Realme GT 5 कन्फर्म फीचर्स
कंपनीने माहिती दिल्याप्रमाणे, Realme GT 5 फोनला जबरदस्त 24GB रॅम मिळेल. यासह, हा फोन सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह दाखल होणार आहे. जर तुमच्याकडे नियमित स्लॅब स्मार्टफोनवर 24GB RAM असेल, तर तुम्हाला एकापेक्षा जास्त ऍप्स बॅकग्राउंडमध्ये ठेवता येतील. या फोनमध्ये 240W पर्यंत सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. 240W चा चार्जर फक्त 9 मिनिटांपेक्षा जास्त वेळेत फोन पूर्णपणे चार्ज करू शकतो.
Realme GT 5 संभावित फीचर्स
लीकवर विश्वास ठेवला तर, Realme GT5 फोन दोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह म्हणजेच 150W आणि 240W फास्ट चार्जिंग पर्यायांसह ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. जुन्या लीक झालेल्या अहवालानुसार, या फोनमध्ये 6.74-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144hz असू शकतो. याशिवाय, हा फोन Octa Core Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. जर तुम्ही रॉ प्रोसेसिंग पॉवर किंवा गेमिंगसाठी एखादे उपकरण शोधत असाल तर Snapdragon 8 Gen 2 चिपसेट तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल.
यासोबत फोनमध्ये चार रॅम आणि स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये 8GB, 12GB, 16GB आणि 24GB रॅम पर्याय आहेत. त्याबरोबरच, स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज मिळेल. फोनची बॅटरी 4600mAh असेल, ज्यामध्ये 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. 5080mAh बॅटरी पर्यायासह 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, यात 50MP प्राथमिक, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP कॅमेरा आहे. स्मार्टफोन कॅमेर्यासाठी 50MP हे निश्चितच हाय रिझोल्यूशन आहे. याद्वारे तुम्ही अतिशय डिटेल्ड आणि शार्प इमेजेस कॅप्चर करू शकता. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile