digit zero1 awards

Realme Festive Days Sale: 5000mAh बॅटरी आणि 8GB पर्यंत RAM असलेल्या स्मार्टफोन्सवर Best डील्स, बघा यादी

Realme Festive Days Sale: 5000mAh बॅटरी आणि 8GB पर्यंत RAM असलेल्या स्मार्टफोन्सवर Best डील्स, बघा यादी
HIGHLIGHTS

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme Festive Days सेल सुरू केला आहे.

निवडक बँकांच्या कार्ड्सवर सवलतींसोबतच अनेक फोनवर कूपन डिस्काउंट

सेलमध्ये फोनवर 1000 रुपये बँक डिस्काउंट, 1000 रुपये कूपन डिस्काउंट उपलब्ध

Realme Festive Days सेल सुरू झाला आहे. यामध्ये Realme स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. सेलदरम्यान, निवडक बँकांच्या कार्ड्सवर सवलतींसोबतच अनेक फोनवर कूपन डिस्काउंट देखील आहेत. Realme India च्या अधिकृत वेबसाइटवरून फोन खरेदी केल्यास अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. सेलदरम्यान कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करता येतील.

हे सुद्धा वाचा: Jio युजर्ससाठी Diwali Gift! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 23 दिवसांची अतिरिक्त वैधता, कॉल आणि डेटा सर्व Free

Realme Narzo 60x 5G

Realme Narzo 60x 5G तुम्ही 10,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकता. Realme च्या या फोनवर 1250 रुपयांची सूट आणि 750 रुपयांची बँक सूट आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज आहे. यात MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, 5000mAh बॅटरीसह फोन 50MP AI कॅमेराने सुसज्ज आहे.

realme 11 pro plus 5g

Realme 11 5G

Realme 11 5G फोन 14,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. Realme च्या या 5G फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेजसह 8GB रॅम आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 2000 रुपये आणि 2000 रुपये कूपन ऑफ आहे. स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि 67W SUPERVOOC चार्जिंग स्पीडसह 5000mAh बॅटरी आहे.

Realme 11 Pro 5G

Realme 11 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते. सेलमध्ये फोनवर 1000 रुपये बँक डिस्काउंट, 1000 रुपये कूपन डिस्काउंट आणि 2000 रुपयांची सूट मिळत आहे. याची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. फोन 100MP OIS कॅमेरा आणि Dimensity 7050 5G चिपसेटने सुसज्ज आहे.

Realme Narzo N53

Realme Narzo N53 हा स्मार्टफोन 7,799 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 1000 रुपयांची सूट देऊन खरेदी करण्याची संधी आहे. यात 8GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP AI कॅमेरासह 6.74-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo