Realme C67 5G स्मार्टफोन भारतात शानदार फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
Realme ने C-सीरीजचे नवीन डिव्हाइस Realme C67 5G भारतात लाँच केले.
कंपनीने हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.
फोनच्या कॅमेरामध्ये लाईव्ह, पॅनोरमा आणि नाईट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Realme ने C-सीरीजचे नवीन डिव्हाइस Realme C67 5G भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन बजेट विभागात लाँच करण्यात आला आहे. मुख्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme C67 मध्ये LCD डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. तसेच, हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. बघुयात या फोनची किंमत आणि इतर सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: प्रिमियम लुकसह Lava Yuva 3 Pro हा Affordable स्मार्टफोन भारतात, लेटेस्ट फोनची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News
Realme C67 5G ची किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. कंपनीने Realme C67 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी ठेवली आहे. तर, त्याच्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची प्रारंभिक विक्री 16 डिसेंबरपासून सुरू होईल. तर, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 20 डिसेंबरपासून पहिली विक्री सुरू होईल. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 2 हजार रुपयांपर्यंत बँक सवलतही मिळणार आहे.
Realme C67 5G
Realme C67 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉरमन्ससाठी या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर, Mali G57 GPU सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. तर, या फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. या फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.
Realme C67 मध्ये LED फ्लॅश लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 2MP दुय्यम सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा आहे. कॅमेरा विभागात उपलब्ध असलेल्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये लाईव्ह, पॅनोरमा आणि नाईट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile