प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme येत्या 4 एप्रिल रोजी आपला Realme C65 स्मार्टफोन घेऊन येत आहे. ब्रँडने पुष्टी केलेली की, हे उपकरण C-सीरीज अंतर्गत व्हिएतनाममध्ये जागतिक स्तरावर लाँच केले जाईल. फोनच्या भारतीय लाँचबद्दल अद्याप माहिती पुढे आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या ब्रँड हेडने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक इमेज शेअर केली आहे. ज्यामध्ये Realme C65 ची डिझाईन समोर आली आहे. चला तर मग बघुयात आगामी Realme C65 बद्दल सविस्तर माहिती-
हे सुद्धा वाचा: Airtel चे प्रीपेड प्लॅन्स लवकरच महागण्याची शक्यता! आजच रिचार्ज करा ‘हे’ वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स। Tech News
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रँड हेडने शेअर केलेल्या टीझर इमेजमध्ये Realme C65 पूर्वीच्या मॉडेलपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एक रेक्टॅंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात उभ्या पॅटर्नमध्ये तीन सेन्सर आहेत. जिथे ड्युअल कॅमेरा आणि दुसरा सेन्सर असू शकतो. त्यासोबत LED फ्लॅश दिसत आहे.
फोनच्या मागील बाजूस अतिशय चमकदार डिझाइन दिसत आहे आणि बॉटमला Realme ब्रँडिंग दिलेली आहे. डिव्हाइसच्या उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे दिलेली आहेत. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme C65 टीझरमध्ये ब्लु आणि ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स दिसले.
Realme C65 फोनचा डिस्प्ले FHD Plus रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येऊ शकतो. फोनच्या प्रोसेसरबद्दल असे समोर आले आहे की, हा डिवाइस MediaTek Helio G85 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. स्टोरेजच्या बाबतीत, Realme C65 मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे.
कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असू शकतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स असण्याची अपेक्षा आहे. बॅटरीच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि ती लवकर चार्ज करण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे तर, डिव्हाइस नवीनतम Android 14 आधारित Realme UI 5.0 वर आधारित असू शकते.