Realme C65 5G हा कंपनीचा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार
हा 5G फोन डिसेंबरमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो.
Realme C65 5G मध्ये 4GB ते 8GB पर्यंतचे रॅमचे पर्याय मिळतील.
Realme C65 5G हा कंपनीचा आगामी स्मार्टफोन आहे, जो लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप या फोनबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अनेक लीकमध्ये या फोनची चर्चा टेक विश्वात सुरु आहे. आता लेटेस्ट अपडेटमध्ये फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता, Realme च्या आगामी फोनबद्दल माहिती बघुयात.
Realme लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme C65 5G सादर करण्यात येईल. हा भारतातील C सीरीजचा पहिला 5G स्मार्टफोन असणार आहे, असे देखील म्हटले जात आहे. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार, हा 5G फोन डिसेंबरमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो.
Realme C65 5G ची अपेक्षित किंमत
लीक अहवालानुसार, Realme C65 5G ची भारतात किंमत 12 हजार ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज असेल. त्याबरोबरच, हा फोन ग्रीन आणि पर्पल कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लक्षात घ्या की, या डिवाइसचे इतर स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. पण कंपनी लवकरच याबाबत घोषणा करेल.
Realme C65 5G चे संभावित तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, Realme C65 5G मध्ये 4GB ते 8GB पर्यंतचे रॅमचे पर्याय मिळतील. त्याबरोबरच, वर सांगितल्याप्रमाणे फोनमध्ये 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देखील मिळणार आहे. बजेट रेंजमध्ये हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अलीकडेच कंपनीने भारतात Realme C51 लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो बजेटमध्ये आकर्षक फीचर्स आणतो. Realme चे बजेट रेंजमध्ये येणारे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.