प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आपल्या नव्या Realme C65 5G स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची पुष्टी केली आहे. यासह कंपनीने या स्मार्टफोनचे पहिले टीझर पोस्टर देखील जारी केले आहे. टीझर पोस्टरद्वारे फोनच्या लॉन्च तपशील आणि बजेट रेंजबद्दल माहिती समोर आली आहे. एवढेचं नाही तर, या फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील Flipkart वर LIVE झाली आहे. चला तर मग फार वेळ न घालवता बघुयात Realme C65 5G चे लॉन्चिंग डिटेल्स.
Realme ने Realme India च्या अधिकृत X (Twitter) हँडलवर Realme C65 5G स्मार्टफोनच्या लाँचबाबत माहिती दिली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने या फोनचे पहिले टीझर पोस्टर रिलीज केले आहे.आम्ही सांगितल्याप्रमाणे, या टीझर पोस्टरद्वारे लॉन्चपूर्वी फोनची किंमत श्रेणी देखील समोर आली आहे. कंपनीने शेअर केलेली पोस्ट तुम्ही खाली बघू शकता.
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme चा हा Realme C65 5G फोन भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार, अशी शक्यता आहे. सध्या, कंपनीने फोनच्या लाँच डेटची पुष्टी केलेली नाही. Realme व्यतिरिक्त, फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील फ्लिपकार्टवर लाईव्ह झाल्याने हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Realme C65 5G फोनबद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. फोनच्या अनेक फीचर्सशी संबंधित तपशील लीकद्वारे समोर आले आहेत. फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP चा बॅक कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी 5000mAh असेल. सध्या फोनशी संबंधित हेच तपशील ऑनलाइन समोर आले आहेत. त्याबरोबरच, हा फोन तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम असेल. तसेच, लवकरच कंपनी फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा करेल. त्यानंतरच फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स कन्फर्म होतील.