Realme C63 फोन भारतीय बाजारात Powerful फीचर्ससह लाँच, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी

Realme C63 फोन भारतीय बाजारात Powerful फीचर्ससह लाँच, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Realme चा नवा Realme C63 स्मार्टफोन भारतीय बाजरात लाँच

Realme C63 फोनमध्ये तुम्हाला स्वस्तात फोटोग्राफीसाठी 50MP रियर कॅमेरा आहे.

Realme C63 फोनची विक्री 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

Realme C63: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा नवा Realme C63 स्मार्टफोन भारतीय बाजरात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला स्वस्तात फोटोग्राफीसाठी 50MP रियर कॅमेरा आहे. तर, बॅटरीसोबत तब्बल 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचे समर्थन आहे. जाणून घेऊयात या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-

Also Read: भारीच की! Realme 13 Pro 5G आणि 13 Pro+ 5G ची इंडिया लाँच Confirm, मिळेल प्रोफेशनल AI कॅमेरा

Realme C63 ची भारतीय किंमत

Realme कंपनीने Realme C63 फोन सिंगल 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Realme.com आणि Flipkart वरून खरेदी करता येईल. फोनची विक्री 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. या फोनमध्ये लेदर ब्लू आणि जेड ग्रीन असे दोन कलर ऑप्शन्स आहेत.

 Realme C63 फोन सिंगल 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच

Realme C63 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme C63 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी कंपनीने हा फोन Unisoc T612 प्रोसेसरने सुसज्ज केला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, ज्यामध्ये 4GB रॅम, 4GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट आणि 128GB स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते. त्याबरोबरच, हा फोन Android 14 आधारित realme UI वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिलेल. त्याबरोरबच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलयचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo