लेटेस्ट Realme C63 ची पहिली सेल भारतात होणार सुरु, बजेट स्मार्टफोनवर Best ऑफर उपलब्ध 

लेटेस्ट Realme C63 ची पहिली सेल भारतात होणार सुरु, बजेट स्मार्टफोनवर Best ऑफर उपलब्ध 
HIGHLIGHTS

Realme चा नवा Realme C63 स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच झाला.

आज 3 जुलै 2024 रोजी या Realme C63 स्मार्टफोनची भारतात पहिली विक्री सुरु होणार

Realme C63 हँडसेटमध्ये Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे.

Realme C63: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा नवा Realme C63 स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच झाला आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 3 जुलै 2024 रोजी या स्मार्टफोनची पहिली विक्री सुरु होणार आहे. ही विक्री Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या काळात फोनवर स्वस्त EMI आणि बँक डिस्काउंट मिळेल. तुम्हाला बजेट किमतीत या स्मार्टफोनवर अनेक पॉवरफुल स्पेक्स मिळतील. चला तर मग जाणून घेउयात Realme C63 वरील ऑफर्स आणि सर्व तपशील-

Realme C63 ची भारतीय किमत

लेटेस्ट Realme C63 ची किंमत भारतात 8,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या किमतीत फोनचा 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वरून लेदर ब्लू आणि जेड ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या काळात फोनवर स्वस्त EMI आणि बँक डिस्काउंट मिळेल.

REALME C63

Realme C63 चे फीचर्स आणि स्पेक्स

Realme C63 या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच लांबीचा HD+LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज फोनमध्ये उपलब्ध आहे. ही स्टोरेज SD कार्डच्या मदतीने 2GB पर्यंत वाढवता येते. एवढेच नाही तर, सुरक्षिततेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील मिळेल.

फोटोग्राफीसाठी Realme च्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये LED फ्लॅश लाइटसह 50MP कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 5000mAh बॅटरी आहे. यात 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo