लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme C63 5G भारतीय बाजरात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme C63 5G भारतीय बाजरात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 
HIGHLIGHTS

Realme चा नवीन Realme C63 5G फोन भारतात लाँच

Realme C63 5G लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात सादर केला आहे.

Realme C63 5G फोन 20 ऑगस्टपासून Flipkart आणि Realme च्या अधिकृत साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Realme C63 5G: सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने सोमवारी म्हणजेच आज 12 ऑगस्ट 2024 रोजी आपला नवीन Realme C63 5G फोन भारतात लाँच केला आहे. हा लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात सादर केला आहे. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme C63 5G ला पाणी आणि धूळाच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग देखील मिळाले आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार Google, Realme चे जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी

Realme C63 5G ची किंमत

realme c63 launched in india

Realme C63 5G स्मार्टफोन 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, 6GB + 128GB व्हेरिएंटची किमत 10,999 रुपये आणि 8GB+ 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 20 ऑगस्टपासून Flipkart आणि Realme च्या अधिकृत साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Realme C63 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme C63 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. Realme C63 5G त्याच्या विभागातील एकमेव 120Hz आय कम्फर्ट डिस्प्ले फोन आहे. फोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी, कंपनीने यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट दिली आहे. चिपसेट दिली आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्येह 8GB डायनॅमिक रॅम समर्थन देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने रॅम पॉवर 16GB पर्यंत वापरली जाईल.

Realme चा नवीन Realme C63 5G फोन भारतात लाँच

Realme C63 5G मध्ये फोटोग्राफीसाठी 32MP AI मुख्य कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये फोटो, व्हिडिओ, नाईट, रोड, प्रो, पॅनो, पोर्ट्रेट, टाइम-लॅप्स, स्लो-मो, टेक्स्ट स्कॅनर, टिल्ट-शिफ्ट आणि मूव्ही-ड्युअल व्हिडिओ यासारख्या अनेक प्रकारचे मोड आहेत. तर आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी त्यात AIने सुसज्ज 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी फुल चार्जवर मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo