लेटेस्ट Realme C63 5G स्मार्टफोनची आज पहिली Sale, स्वस्त 5G फोनवर मिळतेय बंपर सूट
Realme C63 5G स्मार्टफोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन अलीकडेच कंपनीने लाँच केला.
Realme C63 5G स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून भारतात सुरु होणार
पहिल्या सेलदरम्यान HDFC बँकेच्या कार्डद्वारे 1000 रुपयांची सूट उपलब्ध
Realme C63 5G स्मार्टफोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन अलीकडेच कंपनीने लाँच केला होता. त्यानंरत आज भारतात या स्मार्टफोनची पहिली सेल आहे. हा फोन 12 ऑगस्ट 2024 ला लॉन्च झालेला हा स्मार्टफोन पहिल्या सेल दरम्यान अनेक ऑफर्ससह खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Realme C63 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: BSNL New Plan: दीर्घकाळ वैधतेसह प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने लाँच केला नवा प्लॅन, मिळेल तब्बल 320GB डेटा
Realme C63 5G ची पहिली सेल आज
Realme C63 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. या पहिल्या सेलदरम्यान HDFC बँकेच्या कार्डद्वारे 1000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो.
या फोनच्या बेस 4GB रॅमसह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह व्हेरिएंटची किमत 11,999 रुपये आणि 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये आला आहे. हा स्मार्टफोन स्टाररी गोल्ड आणि फॉरेस्ट ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Realme C63 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme च्या या स्वस्त 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, जो रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz सह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय या फोनमध्ये 4G VoLTE, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, Glones आणि USB Type-C पोर्ट आहे.
याव्यतिरिक्त, कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. तर, मागील बाजूस हा फोन 32MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. पॉवरसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W क्विक चार्जला सपोर्ट करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile