digit zero1 awards

बजेट रेंजमध्ये मिळेल iPhone सारखे फिचर, Realmeचा नवीन फोन लाँच

बजेट रेंजमध्ये मिळेल iPhone सारखे फिचर, Realmeचा नवीन फोन लाँच
HIGHLIGHTS

Realme C55 बजेट स्मार्टफोन अखेर लाँच

यात तुम्हाला iPhone सारखे फिचर मिळेल.

यात 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे.

Realme ने अखेर आपला C-सीरीज स्मार्टफोन Realme C55 लाँच केला आहे. Realme C55 हा कंपनीचा मिनी कॅप्सूल फीचर असलेला पहिला स्मार्टफोन आहे. हे  iPhone 14 प्रो डायनॅमिक आयलंड सारख्या मिनी कॅप्सूल फिचरसह सादर केले गेले आहे. यामध्ये हे मिनी कॅप्सूल चार्जिंग स्टेटस, बॅटरी स्टेटस, डेटा स्टेटस आणि काही फिटनेस डेटा दाखवते.  येथे आम्ही तुम्हाला Realme C55 ची किंमत, स्पेसिफिकेशन, फीचर्सबद्दल संपूर्ण तपशील सांगणार आहोत…  

 हे सुद्धा वाचा : भारीच की ! Moto G62 च्या किमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि ऑफर्स

Realme C55 ची किंमत आणि उपलब्धता

Realme C55  6GB + 128GB आणि 8GB + 256GB दोन कॉन्फिगरेशन पर्यायांमध्ये येतो. Realme C55 6GB + 128GB कॉन्फिगरेशनची किंमत सुमारे 13,300 रुपये आहे. Realme C55 8GB + 256GB च्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 16,000 रुपये असेल.  सध्या, Realme C55 India च्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत ते भारतीय बाजारपेठेतही लाँच केले जाण्याची शक्यता आहे. Realme C55 Sunshower आणि Rainy Night चे दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Realme C55 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

 Realme C55 मध्ये फुल HD+ रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेटसह 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. C -सिरीजचा नवीनतम स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G88 चिपसेटसह सुसज्ज आहे. नवीनतम स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

याव्यतिरिक्त, यामध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि LED फ्लॅश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo