'Realme' उद्या भारतात आपला नवीन स्मार्टफोन 'Realme C53' लाँच करण्यास सज्ज झाली आहे. हे उपकरण फ्लिपकार्टवर मायक्रोसाइटमध्ये सूचीबद्ध केले आहे. याद्वारे फोनची काही फीचर्स देखील समोर आली आहेत. हा स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये लाँच केला जाईल. या फोनची प्रारंभिक विक्री देखील Realme ने जाहीर केली आहे, जी उद्या संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत असेल.
त्याबरोरबच, कंपनीने लाँच इनव्हाईटमध्ये लिहिले- बुधवार, 19 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजता. 'Realme C53'- ''108MP Champion Like Never Before'' च्या डिजिटल प्रीमियरसाठी आमच्यासह सामील व्हा.
https://twitter.com/realmeIndia/status/1681191556026621954?ref_src=twsrc%5Etfw
19 जुलै रोजी भारतात संध्याकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान 'Realme C53' ची अर्ली बर्ड सेल होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हा डिवाइस फ्लिपकार्टवर देखील सेलसाठी आणला जाईल. कंपनी या फोनच्या सुरुवातीच्या खरेदीदारांना 6GB + 64GB व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सूट देणार आहे.
याव्यतिरिक्त, ICICI, HDFC आणि SBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर EMI पर्यायांसह बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत.
लीकनुसार, Realme C53 मध्ये 6.4-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. स्मार्टफोन Unisoc चिपसेटवर काम करू शकतो. हा स्मार्टफोन 4GB+64GB आणि 6GB+128GB मध्ये येईल. कंपनीने पुष्टी केली आहे की, Realme C53 ला 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनसोबत 18W चा चार्जर उपलब्ध असेल, जो 52 मिनिटांत 50% बॅटरी चार्ज करेल.