भारतीय बाजारपेठेत Realme च्या बजेट रेंजमधील स्मार्टफोन्सची लोकप्रियता काही औरंच आहे. ताज्या वृत्तानुसार, कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन Realme C51 भारतात 4 सप्टेंबर रोजी लाँच होईल. पूर्वी कंपनीने आपल्या आगामी स्मार्टफोन टीज केले होते, आज Realme ने 'C' सीरीजच्या या नवीन स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केली आहे. यासोबत आगामी स्मार्टफोनची किंमत आणि काही तपशीलदेखील पुढे आले आहेत. बघुयात सविस्तर.
Realme ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, कंपनी भारतीय बाजारात आपला नवीन 'C' सीरीज स्मार्टफोन आणणार आहे. जो भारतात 4 सप्टेंबर रोजी Realme C51 नावाने सादर केला जाणार आहे. Realme C51 इंडिया लाँच यूट्यूब चॅनलसह कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येईल. हा फोन 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार्या व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे बाजारात आणला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीचा आगामी स्मार्टफोन Realme C51 बजेट रेंजमध्ये सादर करण्यात येणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन कंपनीचा लो बजेट डिवाइस असेल. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme C53 भारतात 9,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की, आगामी Realme C51 सध्याच्या C53 स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीत आणला जाईल. म्हणजेच हा स्मार्टफोन 9 हजार रुपयांच्या किंमत श्रेणीत ठेवला जाईल, अशी शक्यता आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये Realme C51 आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात देखील हा फोन समान तपशील आणि वैशिष्ट्यांसह येण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन LCD पॅनलवर बनवली आहे आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. Unisoc T612 चिपसेटसह पॅक केलेला हा स्मार्टफोन पावरफुल परफॉर्मन्स, अखंड मल्टीटास्किंग इ. क्षमता प्रदान करतो. त्याबरोबरच, ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Mali-G57 GPU देण्यात आला आहे.
Realme C51 4 GB रॅम मेमरी वर लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्याच मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात देखील हा फोन येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा फोन 2TB पर्यंत मेमरी कार्डला सपोर्ट करेल. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. ही बॅटरी काही युजर फक्त काही बेसिक कामे करत असल्यास दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. F/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे आणि एक डेप्थ सेन्सर देखील मिळेल. डेप्थ सेन्सर जवळपास कोणत्याही वस्तूची उपस्थिती आपोआप कॅप्चर करू शकतो. हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी F/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. सेल्फीचे शौकीन असेलेल्या युजर्ससाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उत्तम ठरेल. आगामी स्मार्टफोनचे कन्फर्म तपशील हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच समजतील.