digit zero1 awards

Realme C51 Launched: iPhone सारख्या फिचरसह नवा बजेट स्मार्टफोन भारतात दाखल, अर्ली बर्ड सेल ऑफर बघा

Realme C51 Launched: iPhone सारख्या फिचरसह नवा बजेट स्मार्टफोन भारतात दाखल, अर्ली बर्ड सेल ऑफर बघा
HIGHLIGHTS

कंपनीने Realme C51 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला आहे.

Realme C51 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 8,499 रुपये

कंपनीचा दावा आहे की, फोन 28 मिनिटांत 0 ते 50% असेल.

Realme च्या नवीनतम बजेट स्मार्टफोनची चर्चा गेल्या बरेच दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. कंपनीने Realme  C51 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात iPhone सारखे Dynamic island फीचर देखील उपलब्ध आहे, ज्याला कंपनीने 'मिनी कॅप्सूल' असे नाव दिले आहे. बघुयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स. 

Realme C51 ची भारतीय किंमत

realme c51

कंपनीने Realme C51 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 8,499 रुपये निश्चित केली आहे. या फोनमध्ये कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन कलरचे पर्याय सादर करण्यात आले आहेत. या फोनची अर्ली बर्ड सेल संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, जी 2 तास म्हणजेच रात्री 8 वाजेपर्यंत लाइव्ह असेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले, तर ICICI बँक कार्डद्वारे यावर 500 रुपये सूट देखील दिली जात आहे.

Realme C51 चे तपशील 

Realme C51 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच  लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय, फोन UNISOC T612 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. Unisoc T612 चिपसेटसह पॅक केलेला स्मार्टफोन पावरफुल परफॉर्मन्स, अखंड मल्टीटास्किंग आणि एन्हान्स कॅमेरा कॅपॅबिलिटीज सुलभ किंमतीच्या ठिकाणी प्रदान करतो.

realme c51

फोटोग्राफीसाठी Realme C51 स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप क्विक आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा आला आहे. 50MP कॅमेरा कमी-रिझोल्यूशन कॅमेरापेक्षा अधिक तपशील कॅप्चर करू शकतो. तसेच, कॅमेरा अधिक माहिती कॅप्चर करण्यास सक्षम असतो. त्याच्यासोबत फोनमध्ये 0.08MP चा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फ आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP कॅमेरा येतो.

फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यासोबत 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट केला गेला आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन 28 मिनिटांत 0 ते 50% असेल. फोनमध्ये मूलभूत कार्ये करताना या फोनची बॅटरी लाईफ जवळपास दोन दिवसांची आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo