फोनची पहिली विक्री 8 जुलै रोजी दुपारी 12:00 वाजता होईल
तुम्ही फोन realme.com, Flipkart.com आणि मेनलाइन चॅनेलवरून खरेदी करू शकता.
iPhone खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु जर तुमच्याकडे आयफोन घेण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही हा Realmचा फोन खरेदी करू शकता, तो अगदी iPhone 13 सारखा दिसतो. खरं तर, Realme ने Realme C35 चा 6GB + 128GB व्हेरिएंट सादर केला आहे. जो सर्वात स्टायलिश ऑलराउंडर परफॉर्मर स्मार्टफोन आहे. अलीकडेच लाँच झालेल्या Realme C35 ने त्याच्या ट्रेंडसेटिंग ग्लोइंग डिझाइन, मोठी स्क्रीन, मेगा बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्तेसह एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती…
Realme C35 च्या 6GB + 128GB फोनची किंमत आणि पहिली विक्री
Realme C35 च्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत INR 15,999 आहे. हा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल – ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन. पहिली विक्री 8 जुलै रोजी दुपारी 12:00 वाजता होईल. तुम्ही फोन realme.com, Flipkart.com आणि मेनलाइन चॅनेलवरून खरेदी करू शकता.
Realme C35 च्या 6GB + 128GB फोनचे फीचर्स
Realme C35 फोन 50MP AI ट्रिपल कॅमेराने सुसज्ज आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे ब्लॉकबस्टर शॉट घेऊ शकतात. तसेच, स्मार्टफोन पावरफुल Unisoc T616 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो त्याच्या विभागातील सर्वोत्तम आहे. Realme च्या C सिरीजमधील हा पहिला फोन आहे, जो FHD 6.6-इंच स्क्रीनसह येतो. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी बॉक्समध्ये येणाऱ्या 18W टाइप-सी क्विक चार्जने चार्ज केली जाऊ शकते. Realme C35 झटपट फिंगरप्रिंट सेन्सर आणि TUV Rheinland हाय रिलायबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.