Realme C33 वर भन्नाट ऑफर सुरु ! फक्त रु. 549 मध्ये तुमचा होईल फोन, बघा खास ऑफर

Updated on 31-Oct-2022
HIGHLIGHTS

Realme C33 वर जबरदस्त ऑफर सुरु

एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास अगदी कमी किमतीत मिळेल फोन

FLIPKART वर सुरु आहे ही अप्रतिम ऑफर

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल पण बजेट कमी असेल, तर जुना फोन एक्सचेंज करण्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरील फेस्टिव्ह सेल निश्चितच संपली आहे, परंतु स्मार्टफोनवर मोठ्या सवलती अजूनही सुरु आहेत. अशा ऑफर्स आणि मजबूत फीचर्ससह Realme C33 अतिशय कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा : T20 विश्वचषकाचे सामने बघा मोफत ! Disney + Hotstar चे सदस्यत्व घेण्याची गरज नाही, वाचा डिटेल्स

काही महिन्यांपूर्वी, भारतीय बाजारपेठेत लाँच झालेल्या Realme C33 मध्ये देखील मोठ्या बॅटरीसह मजबूत कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट लुक आणि डिझाइनसह आणला आहे. फ्लिपकार्ट या फोनवर स्टॅंडर्ड डिस्काउंट व्यतिरिक्त बँक ऑफर बेनिफिटदेखील देत आहे. डिव्हाइसची सुरुवातीची किंमत भारतात 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

'अशा'प्रकारे कमी किमतीत खरेदी करा Realme C33

3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह Realme C33 च्या बेस व्हेरिएंटची लिस्टेड किंमत 11,999 रुपये आहे. परंतु ती सध्या 8,799 रुपयांना उपलब्ध आहे. 3,200 रुपयांच्या सवलतीशिवाय तुम्हाला Flipkart Axis Bank कार्ड पेमेंटवर 5% कॅशबॅक देखील मिळेल. यासोबतच, फ्लिपकार्ट पे लेटरद्वारे 1,000 रुपयांचे गिफ्ट कार्ड दिले जात आहे.

जर तुम्ही जुना स्मार्टफोन खरेदी करताना एक्सचेंज केला तर तुम्हाला 8,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. या डिस्काउंटनंतर तुम्हाला फोनसाठी फक्त 549 रुपये द्यावे लागतील. या अगदी कमी किमतीत Aqua Blue, Night Sea आणि Sandy Gold या तीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा… 

Realme C33

Realme चा बजेट स्मार्टफोन 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले दाखवतो ज्याची कमाल 400nits ब्राइटनेस आणि 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. फोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि Android 12 आधारित सॉफ्टवेअर स्किन उपलब्ध आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. यात दीर्घ बॅकअपसाठी यात 5,000mAh बॅटरी आहे. स्टँडबाय मोडमध्ये ही बॅटरी 38 दिवस टिकू शकते असा दावा केला जात आहे.

 त्याबरोबरच, यात 50MP प्राइमरी सेन्सर व्यतिरिक्त Realme C33 च्या मागील पॅनलवर 0.3MP सेकंडरी लेन्स देण्यात आले आहेत. हा फोन आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MP फ्रंट कॅमेरासह येतो आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :