Realme चा पॉवरफुल फोन कमी किमतीत भारतात दाखल, 50MP कॅमेरासह मिळेल सर्वोत्तम डिस्प्ले

Updated on 07-Sep-2022
HIGHLIGHTS

Realme C33 स्मार्टफोन भारतात दाखल

कंपनीच्या नव्या फोनची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये

यात 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट

Realme ने भारतात आपला नवीन C सीरीज स्मार्टफोन – Realme C33 लॉन्च केला आहे. हा नवीनतम स्मार्टफोन  3GB+32GB आणि 4GB+64GB या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या 3 GB रॅम वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, फोनचा 4 GB रॅम व्हेरिएंट 9,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला गेला आहे. फोनची विक्री 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून देखील ते खरेदी करू शकता. हा फोन 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी अशा अनेक उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे.

हे सुद्धा वाचा : स्वस्त फोनचा शोध संपला! 5000mAh बॅटरी आणि उत्तम कॅमेरासह Redmi A1 लाँच

Realme C33

कंपनी फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ IPS डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. रिअ‍लमीचा हा बजेट स्मार्टफोन 4 GB पर्यंत रॅम आणि 64 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये Unisoc T612 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

याव्यतिरिक्त, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 12 वर आधारित Realme UI S Edition वर काम करतो.

यात 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फास्ट साइड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये कंपनी 5000mAh बॅटरी देत ​​आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :