Realme च्या 5G फोनवर मिळतोय भारी डिस्काउंट, बघा अप्रतिम ऑफर

Realme च्या 5G फोनवर मिळतोय भारी डिस्काउंट, बघा अप्रतिम ऑफर
HIGHLIGHTS

Realme C33 फोनची खरी किंमत 11,999 रुपये आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 25% सूट मिळणार

फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा

तुम्हाला कमी किमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन हवा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. घरबसल्या तुम्हाला हा फोन मिळणार आहे. Realme C33 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर निम्म्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. तुम्हाला Realme C33 वर प्रचंड डिस्काउंट मिळणार आहे. 

Realme C33 ची किमंत 

Realme C33 फोनची खरी किंमत 11,999 रुपये आहे. परंतु तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 25% सूट मिळणार आहे. यामध्ये बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. तुम्हाला एक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% सूट मिळत आहे. HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

याव्यतिरिक्त, या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्ट तुम्हाला 8,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. मात्र, एक लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरची पूर्ण व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनची बॅटरी, मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असणार आहे.

फीचर्स : 

स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, त्यामध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. हा स्मार्टफोन Unisock T612 चिपसेटसह येतो. तसेच यामध्ये फोनमध्ये तुम्हाला 3 GB आणि 4 GB रॅम व्हेरिएंट ऑप्शन मिळतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीच्या पुढील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo