5000mAh बॅटरीसह Realme चा स्वस्त फोन लवकरच होणार लाँच, 1 सेकंदापेक्षा कमी वेळात होईल अनलॉक

Updated on 09-Sep-2022
HIGHLIGHTS

Realme C30s स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच

कंपनीने Realme C30s स्मार्टफोनचे टीझर पेज जारी केले

डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी असण्याची पुष्टी

Realme ने अलीकडेच भारतात नवीन C-सीरीज फोन म्हणून Realme C33 लाँच केला आहे. आता, कंपनी Realme C30s नावाचा आणखी एक Realme C-सीरीज स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढच्या आठवड्यात भारतात Realme C30s लॉन्च करेल. Realme C30s भारतात 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. 

कंपनीने त्याचे टीझर पेज जारी केले आहे, ज्यामधून फोनच्या काही फीचर्सबद्दल माहिती मिळतेय. त्यामध्ये फोन Realme C30 सारखा आहे, असे दिसतंय. साइड-माउंट केलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरची उपस्थिती आणि वेगळ्या चिपसेटमध्ये फक्त मुख्य फरक असेल. जाणून घ्या, लॉन्चपूर्वी फोनचे संभावित फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! SAMSUNGच्या 5G फोनवर 7 हजार रुपयांची सूट, तसेच 1 हजार रुपयांचा कॅशबॅक 

Realme C30s

टीझर पेजनुसार, Realme C30s 6.5-इंच लांबीच्या डिस्प्लेसह येईल. परंतु याक्षणी रिझोल्यूशनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा एक बजेट फोन असल्याने, आम्ही HD+ स्क्रीन आणि स्टॅंडर्ड 60Hz रिफ्रेश रेटची अपेक्षा करू शकतो. तसेच, डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी असण्याची पुष्टी झाली आहे. जी आजकाल बहुतेक बजेट फोनसाठी खूपच स्टॅंडर्ड बनली आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये शार्प साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल. कंपनीचा दावा आहे की, तो 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत फोन अनलॉक करेल.

 Realme C30s मागील बाजूस LED फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरासह येईल. अधिकृत साइटवर डिव्हाइस ब्लु आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये दर्शविले आहे. प्रोसेसरसाठी, Realme C30s ऑक्टा-कोर चिपसेटसह सुसज्ज असेल, परंतु कंपनीने अद्याप चिपचे नाव उघड केलेले नाही. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :