digit zero1 awards

Best Selling Celebration: Realme चा नवा Sale सुरु, कंपनीचे Narzo सिरीज स्मार्टफोन्स बंपर Discount सह उपलब्ध 

Best Selling Celebration: Realme चा नवा Sale सुरु, कंपनीचे Narzo सिरीज स्मार्टफोन्स बंपर Discount सह उपलब्ध 
HIGHLIGHTS

Realme चा भारतात 'Best-Selling Celebration' सेल सुरू

हा सेल 4 डिसेंबरपासून सुरू झाला असून 10 डिसेंबरपर्यंत चालेल.

Realme Narzo 60 Pro 5G फोनची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे.

Realme ने भारतात ‘Best-Selling Celebration’ सेल सुरू केला आहे. या सेल अंतर्गत कंपनी आपल्या ‘Narzo ‘ सीरिजच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ऑफर अंतर्गत, Realme Narzo स्मार्टफोन तब्बल 4,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेल अंतर्गत Narzo सीरिजचे 5 स्मार्टफोन्स स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Realme Narzo स्मार्टफोनवरील हा सेल 4 डिसेंबरपासून सुरू झाला असून 10 डिसेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान पुढील सर्व मोबाइल फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Realme.in वरून तसेच ई-कॉमर्स शॉपिंग साइट Amazon India वरून कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

हे सुद्धा वाचा: खुशखबर ! Vivo T2 5G आणि Vivo Y56 5G मध्ये मोठी Price Cut, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Realme Narzo 60 5G

Realme Narzo 60 5G वरील ऑफर

कंपनी या सेल अंतर्गत Realme Narzo 60 5G फोनवर 2,000 रुपयांची सूट देत आहे. यापूर्वी या फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होता. आता तो केवळ 15,999 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. या सवलतीसह फोनचा 8 GB + 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांना मिळेल.

Realme Narzo N55 वरील ऑफर

Realme Narzo N55 स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पूर्वी फोनचा 6GB रॅम व्हेरिएंट 12,999 रुपयांना उपलब्ध होता. सेलमध्ये फोन केवळ 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनच्या 4GB रॅम वेरिएंट 750 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर फोन 8,999 रुपयांऐवजी 8,249 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme Narzo 60 Pro 5G वरील ऑफर

कंपनीने 8GB रॅमसह येणाऱ्या Realme Narzo 60 Pro 5G फोनची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन सेलमध्ये 23,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनच्या इतर 12GB रॅम व्हेरिएंट्सवर देखील 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Realme Narzo N53 वरील ऑफर

Realme Narzo N53 स्मार्टफोन सेलदरम्यान 1,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. इतर वेळी 8GB रॅम असलेला हा मोबाइल 11,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असतो. तर, सेलदरम्यान मिळत असलेल्या सवलतीसह हा फोन केवळ 10,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme Narzo 60x 5G ऑफर

Realme Narzo 60X 5G फोनच्या 6GB रॅम वेरिएंटवर 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामुळे फोन 14,499 रुपयांवरून 13,499 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. त्याबरोबरच, या फोनचा 4GB रॅम व्हेरिएंट 750 रुपयांच्या डिस्काउंटसह केवळ 12,249 रुपयांना खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo