स्मार्टफोन ब्रँड Realme ने आपला नवीन 5G फोन Realme 9i 5G भारतात लाँच केला आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.6-इंच लांबीच्या डिस्प्लेसह MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. RAM देखील वाढवता येणार आहे. Realme 9i 5G मध्ये 50-megapixel रियर कॅमेरा सेटअपसह 5,000mAh बॅटरी आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स…
हे सुद्धा वाचा : NOKIA उत्तम स्पेक्स आणि स्टायलिश डिझाइनमध्ये पावरफुल फोन लाँच केला, किंमत 5 हजारांपेक्षा कमी
Realme 9i 5G Android 12 आधारित UI 3.0 सह येतो. यात 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट, (1,080×2,400 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये Octa-core MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येईल.
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो.
फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/AGPS आणि USB Type-C पोर्ट उपलब्ध आहेत. यासोबतच फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे.
Realme 9i 5G च्या 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज 13,999 रुपयांना आणि 128 GB स्टोरेजसह 6 GB 15,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन मेटॅलिक गोल्ड, रॉकिंग ब्लॅक आणि सोलफुल ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. 24 ऑगस्टपासून हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.