digit zero1 awards

भारीच की ! अगदी स्वस्तात खरेदी करा Realme चा 5G स्मार्टफोन, बघा ऑफर

भारीच की ! अगदी स्वस्तात खरेदी करा Realme चा 5G स्मार्टफोन, बघा ऑफर
HIGHLIGHTS

Realme 9 5G प्रचंड सवलतीसह खरेदी करा.

आता 5G फोन पूर्वीसारखे महाग नाहीत.

ही भारी ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध

भारतात 5G नेटवर्क सुरू झाल्यापासून लोकांच्या मनात प्रश्न नक्कीच येतो की ते किती वेगाने चालते. मात्र, त्याचा वेग तपासण्यासाठी तुमच्याकडे 5G सपोर्ट असलेला फोन असणे आवश्यक आहे. आता 5G फोन पूर्वीसारखे महाग नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त 5G स्मार्टफोन Realme 9 5G बद्दल सांगणार आहोत, जो Flipkart वर मोठ्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा : आता Google Chromeमध्येही मिळेल फिंगरप्रिंट लॉक, 'अशा'प्रकारे करा ऑन…

Realme 9 5G वर ऑफर

Realme 9 5G स्मार्टफोनची 4 GB RAM/ 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची MRP रु. 18,999 आहे, परंतु 26 टक्के सवलतीनंतर ती रु. 13,999 वर उपलब्ध आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. जुना किंवा सध्याचा फोन देऊन एक्सचेंज ऑफर 13,300 रुपयांपर्यंत किंमत कमी करू शकते. मात्र, यासाठी बदल्यात दिलेला तुमचा फोन कंडिशन आणि मॉडेलमध्ये योग्य असावा. वरील ऑफर्ससह हा फोन तुम्हाला अगदी स्वस्तात खरेदी करता येईल. 

Realme 9 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 Realme 9 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल, 20: 9 आस्पेक्ट रेशो आणि 90 Hz रिफ्रेश रेट आहे. स्टोरेजसाठी या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB रॉम आहे, जी मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. कंपनी या फोनसोबत एक वर्षाची वॉरंटी देते.

 या फोनमध्ये पहिला कॅमेरा 48MP चा, दुसरा कॅमेरा 2MP चा आणि तिसरा 2MP चा कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, ज्यामुळे तो बराच काळ वापरला जाऊ शकतो. या फोनमध्ये Mediatek Dimensity 810 प्रोसेसर येतो, ज्यासोबत ARM Mali-G57 MC2 उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo