असे समोर येत आहे कि Realme नवीन जेनरेशनच्या स्मार्टफोन्स वर काम करत आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्सच्या नावावरून समजते कि आता भारतात Realme 6 सीरीज लॉन्च केली जाऊ शकतो, हि स्मार्टफोन सीरीज भारतात आधीपासून उपलब्ध असेलेल्या Realme 5 च्या जेनरेशनचे नवीन मोबाईल फोन असतील. अजूनतरी Realme 6 सीरीजच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही पण असे समोर येत आहे कि कंपनी Realme X2 Pro मोबाईल फोन 20 नोव्हेंबरला लॉन्च करू शकते. तसेच Realme 6 सीरीज बद्दल बोलायचे तर याचा एक रिटेल बॉक्स ऑनलाइन लीक झाला आहे, ज्यानुसार या मोबाईल फोन मध्ये 5 कॅमेरा असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे स्लॅशलीकच्या माध्यमातून Realme 6 चा हा रिटेल बॉक्स समोर आला आहे. या फोटो मध्ये जो समोर आला आहे तो बॉक्स फक्त वरून बघता येतो. या बॉक्स वर फोनचे नाव मोठ्या अक्षरात दिसत आहे. पण या बॉक्स वर फोनचे दोन सर्वात मोठे फीचर पण दिसत आहेत.
या बॉक्स वर लिहिण्यात आले आहे कि या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक पेंटा-लेंस म्हणजे 5 कॅमेरा सेटअप असलेला रियर कॅमेरा मिळणार आहे. तसेच हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. जर हे खरे असले तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 5 रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक चांगला प्रोसेसर पण मिळणार आहे, हा प्रोसेसर बघून अंदाज लावला जाऊ शकतो कि हा मोबाईल फोन मिड-रेंज सेगमेंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
Realme X2 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर भारतात आगामी 20 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो तसेच अशी पण माहिती समोर आली आहे कि हा मोबाईल फोन Q2 2020 मध्ये एंड्राइड 10 चा अपडेट दिला जाणार आहे.
फ्लॅगशिप Realme X2 Pro चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. Realme X2 Pro मोबाईल फोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे याचा एक स्पेशल एडिशन पण लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोनचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट कंपनीने RMB 2,599 म्हणजे जवळपास Rs 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे, त्याचबरोबर याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल RMB 2,799 म्हणजे जवळपास Rs 27,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल RMB 3,199 म्हणजे जवळपास Rs 31,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचबरोबर या मोबाईल फोनचा मास्टर एडिशन 12GB की रॅम आणि 256GB स्टोरेज सह RMB 3,299 म्हणजे जवळपास Rs 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
वर सांगितल्याप्रमाणे हा मोबाईल फोन म्हणजे Realme X2 Pro एक फ्लॅगशिप मोबाईल फोन म्हणून लॉन्च केला गेला आहे, या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा एक Super AMOLED डिस्प्ले मिळत आहे. जो तुम्हाला FHD+ रेजोल्यूशन सह मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला OnePlus 7 Pro, OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro मोबाईल फोन्स प्रमाणे 90Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन मिळत आहे. मोबाईल फोन लिक्विड कुलिंग फीचर सह लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाला 4000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. हा 50W VOOC फास्ट चार्जिंग सह मिळत आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक क्वाड-कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 64MP चा मेन कॅमेरा मिळत आहे, तसेच यात तुम्हाला एक 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस मिळत आहे, सोबतच तुम्हाला एक 13MP ची टेलीफोटो लेंस पण मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 2MP चा डेप्थ सेंसर मिळत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळत आहे.