digit zero1 awards

Realme 5G Sale: कंपनीचा जबरदस्त सेल सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत

Realme 5G Sale: कंपनीचा जबरदस्त सेल सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत
HIGHLIGHTS

Realme वेबसाइटवर Realme 5G सेल सुरू झाला आहे.

Realme चा सेल देशभरात 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील.

सेलदरम्यान ग्राहक जास्तीत जास्त बचत करू शकतात. बघा सर्व ऑफर्स आणि डील्स.

Realme 5G सेल भारतात सुरू झाला आहे. Realme चा सेल देशभरात 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील. या कालावधीत निवडक Realme 5G स्मार्टफोन्सवर सवलत आणि ऑफर दिल्या जात आहेत. Realme वेबसाइटवर Realme 5G सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये नव्याने लॉन्च झालेल्या Realme Narzo 60x 5G वर  1,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची सेल 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता सुरु झाली आहे. 

सेलदरम्यान नव्याने लाँच झालेल्या Realme Narzo 60x, Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G यांचा समावेश आहे. तसेच, सेलदरम्यान ग्राहक जास्तीत जास्त बचत करू शकतात. बघा सर्व ऑफर्स आणि डील्स. 

realme 11 5g

Realme 11 सिरीजमधील ऑफर्स: 

Realme 11 सिरीज Realme 11 5G, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ यासह परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. Realme 11 Pro ची किंमत 21,999 रुपये आणि Realme 11 Pro+ ची किंमत 25,999 रुपये आहे.

– Realme 11 5G वर 1,500 रुपयांची सूट 

– Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ वर 2,000 रुपयांची सूट आहे. 

– खरेदीदार स्मार्टफोनच्या सर्व प्रकारांवर नो-कॉस्ट EMI देखील घेऊ शकतात. 

Realme 11x 5G वरील ऑफर्स

realme 11x 5g

स्मार्टफोनवर कोणतीही सूट दिली जात नाही. त्याच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. Realme 11x 5G नो-कॉस्ट EMI ऑफरसह देखील उपलब्ध आहे. 

Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G वरील ऑफर्स 

Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G सेलमध्ये सवलतीत उपलब्ध आहेत. Narzo 60 5G वर 1,300 रुपयांची सूट आणि Narzo 60 Pro 5G वर 2,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला ICICI, Kotak Mahindra आणि Axis Bank डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo