स्मार्टफोन निर्माता Realme ने आपल्या आगामी Realme 3 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चचा खुलासा केला आहे, हा स्मार्टफोन एप्रिल मध्ये लॉन्च केला जाईल. कंपनी ने अजूनतरी स्मार्टफोनच्या इतर कोणत्याही स्पेक्सचा खुलासा केला नाही. तसेच अजून कंपनी ने डिवाइसच्या लॉन्चची निश्चित तारीख पण जाहीर केलेली नाही. कंपनीचे CEO Madhav Sheth यांनी फक्त संकेत दिले कि Pro वेरिएंट एप्रिल मध्ये लॉन्च केला जाईल.
हि घोषणा करताना, कंपनी ने अलीकडेच लॉन्च झालेला Xiaomi Redmi Note 7 Pro प्रेजेंटेशन स्लाइड मध्ये दाखवला होता. याचा अर्थ असा कि Realme आपल्या आगामी Realme 3 Pro स्मार्टफोनने Redmi Note 7 Pro ला टक्कर देईल. कंपनीने या स्मार्टफोन साठी “स्पीड अवेकंस” टॅगलाईनचा वापर केला आहे ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो कि या स्मार्टफोनच्या परफॉरमेंस वर कंपनी जास्त लक्ष देत आहे.
असे होऊ शकते कि हा आगामी डिवाइस Redmi Note 7 Pro ला टक्कर देईल किंवा त्यासारखेच स्पेक्स घेऊन येईल. मागे आलेल्या रुमर्स नुसार, या स्मार्टफोन मध्ये पण एक 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असू शकतो जसा Redmi Note 7 Pro मध्ये आहे. पण कंपनी ने कंपनी 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेलल्या स्मार्टफोन वर काम करत आहे हा दावा नाकारला आहे.
याव्यतिरिक्त, Realme 3 Pro फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येऊ शकतो आणि स्मार्टफोन एंड्राइड 9 पाई वर आधारित ColorOS 6 वर लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी ने अलीकडेच खुलासा केला होता कि यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत रियलमीच्या सर्व डिवाइसेजना नवीन अपडेट मिळेल.
फीचर्ड इमेज Realme 3 ची आहे.