Realme 14 Pro Series Launch: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आगामी Realme 14 Pro सीरीजची लाँच तारीख जाहीर केली आहे. नव्या सीरिजच्या लॉन्चिंगची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. कंपनी या सीरीज अंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ असे दोन मॉडेल सादर करणार आहे. एवढेच नाही तर, कंपनीने स्मार्टफोनची मायक्रो वेबसाईट Flipkart वर लाईव्ह केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme 14 Pro सिरीजची भारतीय लॉन्चिंग आणि इतर तपशील-
Also Read: Samsung Galaxy S25 Ultra: अपेक्षित लाँच तारीख, भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील, वाचा सविस्तर
वर सांगितल्याप्रमाणे, आगामी Realme 14 Pro Series ची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे केली जाईल. Realme कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या सिरीजची लाँच तारीख जाहीर केली आहे. आगामी Realme 14 Pro सिरीज येत्या 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केली जाईल.
Realme 14 Pro सिरीजबद्दल निवडक माहिती पुढे आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नॉर्डिक डिझाईन स्टुडिओ व्हॅलेर डिझायनर्सच्या सहकार्याने हा स्मार्टफोन डिझाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे Realme 14 Pro सीरीजचे स्मार्टफोन ट्रिपल फ्लॅश मॅजिकग्लो सिस्टमसह येणारे जगातील पहिले स्मार्टफोन असणार. फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील मिळतील. एवढेच नाही तर, AI स्नॅप मोड, AI अल्ट्रा क्लॅरिटी 2.0, AI हायपररॉ अल्गोरिदम फीचर्स फोनमध्ये उपलब्ध असतील.
याव्यतिरिक्त, हा फोन पर्ल व्हाइट आणि स्यूडे ग्रे शेडमध्ये आणले जातील. विशेष म्हणजे हा फोन खास भारतासाठी बीकानेर पर्पल आणि जयपूर पिंक कलरमध्ये सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. तसेच, व्हेगन लेदरसह हा हँडसेट आणला जाईल. फोनबद्दल अधिक माहिती, किंमत आणि सर्व सविस्तर स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.