बहुप्रतीक्षित Realme 13 सिरीज भारतात Powerful फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत
नवीनतम Realme 13 सिरीज अखेर भारतीय बाजारात लाँच
नव्या सिरीजमध्ये Realme 13 5G आणि Realme 13+ 5G दोन स्मार्टफोन मॉडेल्स सादर
Realme या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
चिनी स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने आपली नवीन नंबर सिरीज Realme 13 सिरीज भारतात लाँच केली आहे. या लाइनअपमध्ये Realme 13 5G आणि Realme 13+ 5G असे दोन स्मार्टफोन मॉडेल्स सादर केले गेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन हँडसेटच्या आगमनाने Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना जोरदार स्पर्धा मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme 13 सिरीजची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या iQOO Z9s 5G ची पहिली Sale आज, प्रचंड सवलतीत मिळेल नवा स्मार्टफोन
Realme 13 सिरीजची किंमत
नव्या Realme 13 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, फोनचे 8GB + 256GB मॉडेल 19,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, Realme 13+ 5G च्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर, 8GB+256GB स्टोरेज आणि 12GB+256GB स्टोरेज मॉडेल्स अनुक्रमे 24,999 रुपये आणि 26,999 रुपयांना सादर केले गेले आहेत.
The future of unparalleled speed!
— realme (@realmeIndia) August 29, 2024
It’s time to #SpeedAhead for you to experience lightning-fast speeds with the #realme13Series5G
Exclusive pre-book deals worth up to ₹3000+
Starting from ₹17,999*
Know more: https://t.co/0TbwuJccO4 #UnmatchedSpeed #realme13Plus5G pic.twitter.com/NhKQsOoD1E
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही हँडसेटवर 1000 रुपयांचा कॅशबॅक लाभ मिळेल. याशिवाय, उपकरणांवर नो-कॉस्ट EMI देखील मिळणार आहे.
Realme 13 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Realme 13 सिरीजमध्ये येत असलेल्या Realme 13 मध्ये 6.72 इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले आहे, तर Realme 13 Plus मध्ये AMOLED स्क्रीन आहे.
प्रोसेसर
Realme 13 मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे आणि 13 Plus 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे.
Performance you desire at a price you crave! #realme13Plus5G is here to take the mid-segment by storm. #SpeedAhead with our speed trio. #UnmatchedSpeed #realme13Series5G pic.twitter.com/ImrH9N9bVm
— realme (@realmeIndia) August 29, 2024
कॅमेरा
Realme 13 Plus मध्ये फोटो क्लिक करण्यासाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP OIS लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि आणखी 2MP लेन्स आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर, Realme 13 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याच्या समोर 16MP लेन्स देखील आहे.
बॅटरी
Realme 13 आणि Realme 13+ मध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे, जी अनुक्रमे 45W SuperVOOC आणि 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
इतर फीचर्स
दोन्ही फोनमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहेत. दोन्हीमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile