प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे नवे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता आगामी Realme 13 सिरीजची भारतीय लाँच डेट निश्चित झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारतात Realme 13 Pro सिरीज सादर केली होती. त्यानंतर, आता कंपनी Realme 13 सिरीज सादर करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रो मॉडेल्सच्या तुलनेत ही एक परवडणारी सिरीज असेल, असे सांगण्यात येत आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, लाँचपूर्वी कंपनीने या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाईव्ह केली आहे. या मायक्रोसाईटद्वारे फोनचा लुक आणि फीचर्स समोर आले आहेत. हे फोन प्रो सीरीज सारखेच असणार आहेत. तर, फीचर्स देखील समान राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात Realme 13 सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह नवा OPPO F27 5G फोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेक्स
Realme India ने त्याच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Realme 13 सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. ही सिरीज 29 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने या सिरीजसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाईव्ह केली आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनचे अनेक फीचर्स आणि लुक समोर आले आहेत.
टीझर पोस्टरनुसार, या फोनचा लूक प्रो मॉडेल्ससारखाच आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनच्या मागील बाजूस एक मोठा राऊंडेड कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे. त्याबरोबरच, यात ड्युअल-टेक्श्चर फिनिश देखील पाहिले जाऊ शकते, ज्यामध्ये मार्वल फिनिश पॅनेल दिसत आहे.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. कंपनी दोन कॅमेऱ्यांसह बेस मॉडेल देऊ शकते, असे मानले जात आहे. एवढेच नाही तर, कंपनीने लाँचपूर्वी Realme 13 सीरीजचे अनेक फीचर्स उघड केले आहेत. ही सिरीज MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज असेल. कंपनीने फोनशी संबंधित इतर तपशील लाँचनंतरच उघड होतील.