Realme 13 सिरीजमधील स्मार्टफोनची Sale भारतात आजपासून होणार सुरु, पहिल्या विक्रीदरम्यान मिळतायेत Best ऑफर्स 

Realme 13 सिरीजमधील स्मार्टफोनची Sale भारतात आजपासून होणार सुरु, पहिल्या विक्रीदरम्यान मिळतायेत Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

Realme 13 सिरीज भारतीय बाजारात अलीकडेच लाँच

सिरीज अंतर्गत कंपनीने Realme 13 आणि Realme 13+ हे दोन स्मार्टफोन लाँच केले.

Realme 13 सिरीजची सेल Flipkart वर दुपारी 12 वाजतापासून होणार सुरू

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच भारतात नवे Realme 13 सिरीजचे स्मार्टफोन्स सादर केले होते. या सिरीज अंतर्गत कंपनीने Realme 13 आणि Realme 13+ हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यानंतर, या सिरीजची पहिली विक्री आजपासून भारतात सुरु होणार आहे. ही सेल Flipkart वर दुपारी 12 वाजतापासून सुरू होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Realme 13 सिरीजवरील ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Jio 8th Anniversary Offer: ऍनिव्हर्सरीनिमित्त कंपनीने युजर्सना दिले मोठे गिफ्ट! ‘या’ प्लॅनसह मिळतायेत खास बेनिफिट्स

Realme 13 5G
Realme 13 5G

Realme 13 सिरीजची किंमत

Realme 13 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. त्याचे 8GB + 256GB मॉडेल 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. Realme 13+ 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. या फोनचा 12GB+256GB व्हेरिएंट 26,999 रुपयांना उपलब्ध आहे.

पहिल्या सेलदरम्यान, Realme च्या या दोन्ही स्मार्टफोन्सवर 1,150 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, या फोनवर 809 रुपयांपर्यंत EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.

Realme 13 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Realme 13 मध्ये 6.72 इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले आहे. Realme 13 Plus मध्ये 6.67 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

प्रोसेसर

Realme 13+ मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Realme 13 मध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिप देण्यात आली आहे.

Realme-13-5G-Features

कॅमेरा

Realme 13 मध्ये OIS सह 50MP Samsung S5KJNS प्राथमिक सेन्सर, 2MP मोनो कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, Realme 13+ मध्ये OIS सह 50MP Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर, 2MP मोनो कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

Realme 13 शक्तिशाली 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 45W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच वेळी, Realme 13+ मध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे. यात 80w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट सारखे स्पेक्स दिले गेले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo