गेल्या काही दिवसांपासून Realme च्या आगामी Realme 13 Pro 5G सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. चाहते आतुरतेने या सिरीजच्या भारतीय लाँचची वाट बघत आहेत. त्यानंतर, आता अखेर कंपनीने या सीरिजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. या सिरीजअंतर्गत Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G फोन समाविष्ट असतील. अलीकडेच, कंपनीने या स्मार्टफोन्सचे रंग पर्याय, डिझाइन आणि काही प्रमुख फिचर्सबद्दल माहिती दिली होती. Realme ची पहिली AI फोटो सिस्टम HYPERIMAGE+ फोनमध्ये असेल. जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
Realme India ने Realme 13 Pro 5G सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. ही सिरीज भारतात 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. कंपनीने X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर फोनच्या लाँच डेटबाबत माहिती दिली. तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवर लॉन्च इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता.
या फोनच्या लाँच डेटसह कंपनीने Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील LIVE केली आहे. या साइटद्वारे, फोनची अधिकृत झलक आणि काही प्रमुख फीचर्सबद्दल माहिती पुढे आली आहे. Realme 13 Pro+ 5G फोन मोनेट गोल्ड कलरमध्ये सादर केला जाईल, तर इतर फोनमध्ये गोल्ड व्यतिरिक्त मोनेट पर्पल कलर पर्याय देखील समाविष्ट असेल.
Realme 13 Pro 5G सिरीज फोनमध्ये आपली पहिली AI कॅमेरा सिस्टम HYPERIMAGE+ सादर करणार आहे. यामध्ये अनेक पॉवरफुल कॅमेरा फीचर्स उपलब्ध असतील. यामध्ये AI Ultra Clarity, Ai Smart Removal, AI Group Photo Enhancement, Ai Audio Zoom इ. चा समावेश असणार आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS सपोर्टसह उद्योगातील पहिला 50MP Sony LYT 701 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. त्याबरोबरच, यात 50MP Sony LYT 600 पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर प्रदान केला जाईल, ज्यामध्ये 3X ऑप्टिकल झूम असेल.