भारीच की! Realme 13 Pro 5G आणि 13 Pro+ 5G ची इंडिया लाँच Confirm, मिळेल प्रोफेशनल AI कॅमेरा

भारीच की! Realme 13 Pro 5G आणि 13 Pro+ 5G ची इंडिया लाँच Confirm, मिळेल प्रोफेशनल AI कॅमेरा
HIGHLIGHTS

Realme द्वारे आगामी Realme 13 Pro Series 5G च्या भारतीय लाँचची अधिकृत घोषणा

या सिरीजमध्ये Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro Plus 5G फोन असण्याची शक्यता

Realme 13 Pro आणि 13 Pro Plus हे ब्रँडचे पहिले प्रोफेशनल AI कॅमेरा फोन असतील.

Realme 13 Pro Series 5G: Realme ची नवीन नंबर सिरीज भारतात दाखल होणार आहे. मागील काही काळापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मन्सवर नव्या Realme 13 Pro आणि Realme 13 Pro Plus बद्दल अनेक तपशील शेअर केले जात आहेत. मात्र, आज ब्रँडद्वारे Realme 13 Pro Series 5G च्या भारतीय लाँचची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज भारतात या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये लाँच होणार आहे. जाणून घेऊयात Realme 13 Pro 5G आणि 13 Pro+ 5G चे भारतीय लॉचिंग डिटेल्स-

Also Read: आगामी Lava Blaze X स्मार्टफोनचा टीजर जाहीर! Powerful फीचर्ससह लवकरच भारतात होणार दाखल

Realme 13 Pro Series 5G भारतीय लाँच

कंपनीने जाहीर केले आहे की, Realme 13 Pro सिरीज भारतात लाँच होणार आहे. ब्रँडने अद्याप या सिरीजमध्ये समाविष्ट असलेल्या स्मार्टफोनच्या नावांचे अनावरण केलेले नाही. पण या सिरीजमध्ये Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro Plus 5G फोन लाँच केले जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. एवढेच नाही तर, Realme 13 सिरीजचे प्रोडक्ट पेजदेखील Flipkart या शॉपिंग साइटवर LIVE केले गेले आहे.

Realme 13 Pro Series 5G कॅमेरा

ताज्या अहवालानुसार, Realme 13 Pro आणि 13 Pro Plus हे ब्रँडचे पहिले प्रोफेशनल AI कॅमेरा फोन असतील. लक्षात घ्या की सध्या, फोनमध्ये किती मेगापिक्सेलचे लेन्स दिले जातील, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. परंतु मागील कॅमेरा सेटअपमध्ये HyperImage+ लिहिलेले आहे. त्याबरोबरच, Realme 13 Pro आणि Realme 13 Pro Plus मध्ये AI तंत्रज्ञानाचा समावेश असेल. जे वापरकर्त्यांना फोटो कॅप्चर करण्याच्या आणि संपादित करण्याच्या प्रक्रियेत अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.

Realme 13 Pro Series 5G लीक स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, Realme 13 Pro Plus हे सिरीजमधील सर्वात टॉप मॉडेल असेल, जे Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरवर ऑफर केले जाऊ शकते. फोटोग्राफीच्या दृष्टीने हे विशेष असेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स मिळू शकतात. फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

त्याबरोबरच, Realme 13 Pro 5G फोन देखील मिड रेंजमध्ये येईल, जो 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रदान केले जाईल आणि डायनॅमिक रॅम तंत्रज्ञान देखील उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी यात 50MP रिअर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर, पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरी आणि चार्जिंगसाठी 67W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचे सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo