बहुप्रतीक्षित Realme 13 Pro Series 5G अखेर भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि ऑफर्स

Updated on 30-Jul-2024
HIGHLIGHTS

Realme 13 Pro Series 5G आज भारतीय बाजारात लाँच

Realme 13 Pro Series 5G मिड बजेट श्रेणीमध्ये सादर करण्यात आली आहे.

Realme 13 Pro Series 5G फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे.

Realme च्या आगामी स्मार्टफोन लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. अखेर Realme 13 Pro Series 5G आज भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या सीरीजअंतर्गत, Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन पॉवरफुल प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह आणण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि टॉप 5 फीचर्स-

Also Read: Amazon Great Freedom Festival Sale लवकरच सर्व ग्राहकांसाठी होणार सुरु, स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्सचा होईल वर्षाव

Realme 13 Pro Series 5G ची भारतीय किंमत

Realme 13 Pro+ फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते. या फोनचा दुसरा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि तिसऱ्या वेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. हे व्हेरिएंट अनुक्रमे 34,999 रुपये आणि 36,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

तर, Realme 13 Pro 5G देखील तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. या फोनची किंमत 26,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि तिसरा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. ज्यांची किंमत अनुक्रमे 28,999 आणि 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme 13 Pro+ फोन मोनेट गोल्ड आणि एमराल्ड ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येते. तर, Realme 13 Pro 5G फोन मोनेट पर्पल, मोनेट गोल्ड आणि एमराल्ड ग्रीनमध्ये उपलब्ध आहे.

Realme 13 Pro Series 5G अर्ली बर्ड सेल

Realme 13 Pro Series 5G फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. प्री-बुकिंग उद्या दुपारी 12 वाजता सुरू होईल. तर, या फोनची पहिली सेल 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही सिरीज Flipkart आणि Realme वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात. पहिल्या सेलमध्ये फोनवर 3000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर आहे.

Realme 13 Pro Series 5G टॉप फीचर्स

डिस्प्ले

Realme 13 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. तर, Realme 13 Pro 5G फोन 6.7 इंच लांबीच्या OLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.

प्रोसेसर

Realme 13 Pro+ 5G हँडसेट Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, Realme 13 Pro 5G फोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Realme 13 Pro+ 5G फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोप लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. तर, Realme 13 Pro 5G फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP आणि 8MP चा दुसरा सेन्सर आहे. फोन 32MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे.

बॅटरी

Realme 13 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 80W SuperVOOC चार्जिंग स्पीड आहे. तर, Realme 13 Pro 5G मध्ये 5200mAh बॅटरी आहे. त्याची बॅटरी 45W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :