Realme ने अलीकडेच Realme 13 Pro+ 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन पूर्वी Monet Gold आणि Emerald Green कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला होता. दरम्यान, आज कंपनीने 2 सप्टेंबर रोजी देशात Realme 13 Pro+ मोनेट पर्पल कलर व्हेरिएंटची विक्री जाहीर केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Realme 13 Pro सिरीज 5G ने लाँचच्या दोन आठवड्यांच्या आत 112K युनिट्सची विक्री करून नंबर सिरीज विभागात एक उल्लेखनीय टप्पा गाठला, असे कंपनीने म्हटले आहे. बघुयात Realme 13 Pro+ मोनेट पर्पल कलर व्हेरिएंटचे सर्व तपशील-
Realme 13 Pro+ 5G च्या मोनेट पर्पल कलर व्हेरिएंटची विक्री realme.com आणि प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरु झाली आहे. या फोनचा 8GB+256GB व्हेरिएंट 32,999 रुपयांना निश्चित करण्यात आला आहे. तर, 12GB+ 256GB आणि 12GB+ 512GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 34,999 रुपये आणि 36,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्स दरम्यान तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत ऑफ मिळणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही 12 महिने नो कॉस्ट EMI सुद्धा घेऊ शकता. त्याबरोबरच, तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा
Realme 13 Pro+ मधून 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा पूर्ण HD+ कर्व AMOLED स्क्रीन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 2000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट आहे. तर, डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 7i संरक्षण देखील मिळेल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
Realme 13 Pro Plus मध्ये दोन 50MP लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तसेच, फोनच्या फ्रंटमध्ये एक 32MP कॅमेरा उपलब्ध आहे, ज्याद्वारे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करता येते. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, Bluetooth आणि USB Type-C पोर्ट सारखे स्पेक्स आहेत.