Price Cut! नव्या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वीच Realme 13 Pro सिरीजच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत

Updated on 27-Dec-2024
HIGHLIGHTS

Realme आपली आगामी नंबर सिरीज Realme 14 Pro सीरीज जानेवारीमध्ये भारतात लाँच करणार

कंपनीने जुने मॉडेल Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ च्या किमतीत मोठी कपात केली.

कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किमतीत 3000 रुपयांपर्यंत कपात केली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme आपली आगामी नंबर सिरीज Realme 14 Pro सीरीज जानेवारीमध्ये भारतात लाँच करणार आहे. मात्र, ही स्मार्टफोन सिरीज बाजारात येण्यापूर्वीच Realme ने आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने जुने मॉडेल Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ च्या किमतीत मोठी कपात केली आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत एकूण 3000 रुपयांपर्यंत घट झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, Realme 13 Pro आणि 13 Pro Plus ची नवी किंमत-

Also Read: Price Drop! नव्या सिरीजच्या लाँचपूर्वी Samsung Galaxy S24 तब्बल 24,000 रुपयांची सूट, ही डील पुन्हा मिळणे नाही

Realme 13 Pro ची नवी किंमत

कंपनीने Realme 13 Pro च्या सर्व व्हेरिएंटच्या किमतीत 3000 रुपयांपर्यंत घट केली आहे. त्यानंतर या स्मार्टफोन्सची नवी किंमत 8GB RAM + 128GB व्हेरिएंटसाठी 23,999 रुपये, 8GB+ 256GB व्हेरिएंटसाठी 25,999 रुपये आणि 12GB+ 512GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये इतकी आहे. तर, दुसरीकडे Realme 13 Pro+ च्या किमतीत कंपनीने 2000 रुपयांची घट केली आहे.

Realme 13 Pro+ च्या नवीन किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची नवी किंमत 30,999 रुपये, 12GB+ 256GB व्हेरिएंटची नवी किंमत 32,999 रुपये आणि 12GB+ 512GB व्हेरिएंटची नवी किंमत 34,999 रुपये इतकी आहे. फोनच्या नव्या किमतीसाठी तुम्हाला Realme च्या अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल.

Realme 13 Pro आणि 13 Pro Plus चे स्पेक्स

डिस्प्ले

Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ हे दोन्ही स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. या स्मार्टफोन स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश दर आहे. Corning Gorilla Glass 7i च्या संरक्षणासोबत, Realme 13 Pro सीरिजच्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

प्रोसेसर

कंपनीने परफॉर्मन्सच्या बाबतीत Realme 13 Pro आणि 13 Pro+ दोन्ही समान ठेवले आहेत. दोन्ही 5G स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 चिपसेटसह सुसज्ज आहे.

कॅमेरा

Realme 13 Pro 5G फोन ड्युअल रीअर कॅमेराला सपोर्ट करतो आणि Pro+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. Realme 13 Pro 5G फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony LYT-600 OIS मुख्य कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह आहे. तर, Realme 13 Pro Plus च्या मागील पॅनलवर 50MP Sony LYT-701 OIS सेन्सर + 50MP Sony LYT-600 Periscope लेन्स + 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे.

Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G या दोन्ही स्मार्टफोन्सचा फ्रंट कॅमेरा समान आहे. या दोन्ही फोनमध्ये तुम्हाला 32MP सोनी सेल्फी कॅमेरा मिळेल.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, Realme 13 Pro आणि 13 Pro Plus 5G स्मार्टफोन 5,200mAh बॅटरीच्या समर्थनासह येतात. कंपनीने ही बॅटरी आपल्या दोन्ही मोबाईल फोनमध्ये 4 वर्षांच्या बॅटरी हेल्थ गॅरंटीसह दिली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :