एअर जेश्चर सपोर्टसह येणाऱ्या Realme 12x 5G ची Special Sale भारतात आज, बघा Best ऑफर्स। Tech News
Realme 12x 5G फोनची विक्री आजपासून Flipkart वर सुरु होणार
फोनवर 1500 रुपयांपर्यंत सूट आणि 1000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध
Realme 12x 5G फोनमध्ये एअर जेश्चर सपोर्ट देण्यात आला आहे.
Realme 12x 5G भारतात नुकतेच लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी हा स्मार्टफोन प्रथमच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे, ज्यासह तुम्ही जबरदस्त फोटोज क्लिक करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात डिव्हाइसची किंमत, ऑफर आणि सर्व तपशील-
Realme 12x 5G ची भारतीय किंमत
Realme 12X 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. त्याच्या 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 13,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन वुडलँड ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Realme 12x 5G चे Special सेलमधील ऑफर्स
वावर सांगितल्याप्रमाणे, आज 5 एप्रिल 2024 पासून फोनची विक्री Flipkart वर सुरु होणार आहे. होय, आज दुपारी 12 वाजतापासून फ्लिपकार्टवर ही विक्री सुरू होईल. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 1500 रुपयांपर्यंत सूट आणि 1000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, या हँडसेटवर 475 रुपयांचा EMI पर्याय देखील दिला जात आहे. यासह हा फोन तुम्ही अगदी सहज खरेदी करू शकता.
Realme 12x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme 12x 5G मध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.72-इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात 50MP सह आणखी एक लेन्स मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. यात नाईट, पोर्ट्रेट आणि लाईव्हसारखे कॅमेरा मोड आहेत.
याव्यितिरिक्त, फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 12x 5G ला IP54 रेटिंग मिळाले आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरक्षेसाठी यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Realme 12x 5G चे विशेष फीचर्स
Realme 12x 5G फोनमध्ये एअर जेश्चर सपोर्ट देण्यात आला आहे. या फिचरसह वापरकर्ते फक्त हाताच्या जेश्चरने डिव्हाइसला स्पर्श न करता ऑपरेट करू शकतात. त्याबरोबरच, यात व्हीसी कुलिंग सिस्टीम आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, बजेट सेगमेंटमधील हा सर्वात स्लिम फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile