Realme 12x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, यापूर्वी कंपनीने 2023 मध्ये Realme 11x 5G फोन सादर केला होता. आता Realme 12x 5G प्रमुख अपग्रेडसह आणले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme 12x 5G फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: लेटेस्ट Realme फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा Discount आणि Realme Buds वर देखील सूट, बघा Best ऑफर
Realme चा हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हे फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या बेस व्हेरिएंटची ही किंमत आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 13,499 रुपयांना आणला गेला आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 14,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झालास, फोनवर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. टॉप व्हेरिएंटवर 1000 रुपयांचा कॅशबॅक आहे. लक्षात घ्या की, स्मार्टफोनची अर्ली बर्ड सेल आज Flipkart आणि Realme.com वर संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत LIVE असेल. हा फोन वुडलँड ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो.
Realme 12x 5G मध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे, जो Mali G57 GPU सह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन नवीनतम Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर कार्य करतो. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी फोन IP54 रेट केलेला आहे. त्याबरोबरच, हा फोन एअर जेश्चरसह येईल.
फोटोग्राफीसाठी, Realme 12x 5G च्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा आणि दुसरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोरबच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. Realme च्या या एंट्री लेव्हल 5G किलर फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. यासह फोन 30 मिनिटांत 50% चार्ज होईल.